आरसीबीने पहिल्या 15 चेंडूत धडाधड धावा ठोकल्या; आशिष नेहरा मैदानात काय करत बसला?, बंगळुरुच्या वि

RCB विरुद्ध GT IPL 2026 आशिष नेहरा: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने 5 विकेट्सने गुजरातचा पराभव केला. आयपीएल 2026 च्या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपला धडाका कायम राखताना आयपीएलचे विजेतेपद पटकावले. बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद उंचावले. गुजरातला 20 षटकांत 8 बाद 155 धावांवर रोखल्यानंतर बंगळुरूने 18 षटकांत 5 बाद 161 धावा केल्या आणि पुन्हा एकदा आयपीएलचं जेतेपद जिंकले. (RCB vs GT IPL 2026)

गुजरातने 156 धावांचं लक्ष्य दिल्यानंतर आरसीबीकडून व्यंकटेश अय्यर आणि विराट कोहलीने आक्रमक सुरुवात केली. व्यंकटेश अय्यरने चार चौकार आणि दोन षटकारांसह 16 चेंडूंमध्ये 32 धावा ठोकल्या. देवदत्त पडिक्कल केवळ एका धावेवर बाद झाला. त्यानंतर रशीद खानने त्याच षटकात रजत पाटीदार आणि कृणाल पांड्याला बाद करून गुजरातला सावरण्याचा प्रयत्न केला, पण विराट कोहलीने एक बाजू सांभाळून धरली. दरम्यान, टीम डेव्हिडच्या 17 चेंडूंतील 24 धावा केल्या. तर दुसरीकडे, विराट कोहलीने नऊ चौकार आणि तीन षटकारांसह 42 चेंडूंमध्ये नाबाद 75 धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केले.

सामना सुरु असताना आशिष नेहरा मैदानात काय करत बसला? (Ashish Nehra IPL Final 2026)

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या आरसीबीच्या विजयापेक्षा गुजरात संघाचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराची (Ashish Nehra) चर्चा रंगली आहे. व्यंकटेश अय्यर आणि विराट कोहलीने आक्रमक सुरुवात केल्यानंतर डगआऊटमध्ये नखं कापताना दिसला. आशिष नेहराचे यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ak

आणखी वाचा

Comments are closed.