आरसीबीने धर्मशाळाचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल

धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवल्या जात असलेल्या आयपीएल 2026 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) धावांचा पाऊस पाडत गुजरात टायटन्ससमोर 255 धावांचे आव्हान ठेवले आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण आरसीबीच्या फलंदाजांनी तो पूर्णपणे चुकीचा ठरवला. बंगळुरूने निर्धारित 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 254 धावां केल्या.

आरसीबीची सुरुवात वादळी झाली. व्यंकटेश अय्यरने अवघ्या 7 चेंडूत 19 धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 72 धावांची मजबूत भागीदारी केली. कोहलीने 25 चेंडूत 43 धावा (5 चौकार, 1 षटकार) तर पडिक्कलने 19 चेंडूत 30 धावा केल्या.

रजत पाटीदारचे वादळी अर्धशतक!

या डावाचा खरा हिरो ठरला तो कर्णधार रजत पाटीदार. पाटीदारने अवघ्या 33 चेंडूंमध्ये नाबाद 93 धावांची स्फोटक खेळी खेळली, ज्यात 5 चौकार आणि तब्बल 9 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. त्याला कृणाल पांड्याने (28 चेंडूत 43 धावा) उत्तम साथ दिली. दोघांमध्ये चौथ्या गड्यासाठी 95 धावांची भागीदारी झाली. शेवटच्या षटकांमध्ये जितेश शर्माने 5 चेंडूत नाबाद 15 धावा करत धावसंख्या 250 पार नेली.

गुजरातकडून जेसन होल्डरने 2 बळी घेतले, तर कागिसो रबाडाने 2 बळी घेतले असले तरी त्याने 54 धावा मोजल्या. मोहम्मद सिराज आणि कुलवंत खेजरोलिया अत्यंत महागडे ठरले. आता गुजरातच्या फलंदाजांना फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी आयपीएल इतिहासातील एक सर्वात मोठा यशस्वी पाठलाग करावा लागणार आहे.

Comments are closed.