बंगळुरूच्या ‘रॉयल’ वादळात गुजरातचा पालापाचोळा! फायनलचं तिकीट RCBच्या खिशात, पण पराभूत टायटन्सच्
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 IPL 2026 अपडेट : आयपीएल 2026 च्या थरारात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने इतिहास रचत फायनलमध्ये धडक मारली आहे. धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या क्वालिफायर 1 च्या हाय-व्होल्टेज सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (GT) 92 धावांनी धुव्वा उडवला. या दणदणीत विजयामुळे आरसीबीचा संघ यंदाच्या हंगामातील फायनलचे तिकीट मिळवणारा पहिला संघ ठरला आहे.
असेच तुम्ही 𝗣𝗟𝗔𝗬 𝗕𝗢𝗟𝗗! ❤️
गतविजेते @RCBTweets ते सलग दुसऱ्यांदा जाण्याच्या मार्गावर आहेत #TATAIPL अंतिम 👏😌
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/9rs6u5obOw#क्वालिफायर१ | #The FinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/1bhTGqwTok
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 26 मे 2026
आरसीबीचा धावांचा डोंगर
सामन्याची सुरुवात गुजरात टायटन्सच्या बाजूने झाली. गुजरातने नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, आरसीबीच्या फलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत आरसीबीने निर्धारित 20 षटकांत 5 बाद तब्बल 254 धावांचा डोंगर उभा केला. कोहलीने 25 चेंडूत 43 धावा (5 चौकार, 1 षटकार) तर पडिक्कलने 19 चेंडूत 30 धावा केल्या. या डावाचा खरा हिरो ठरला तो कर्णधार रजत पाटीदार. पाटीदारने अवघ्या 33 चेंडूंमध्ये नाबाद 93 धावांची स्फोटक खेळी खेळली, ज्यात 5 चौकार आणि तब्बल 9 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. त्याला कृणाल पांड्याने (28 चेंडूत 43 धावा) उत्तम साथ दिली.
गुजरातचा डाव धावांवर गडगडला
255 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे दोन्ही फलंदाज लवकर बाद झाले. साई सुदर्शनची बॅट यष्टीला लागल्याने तो अवघ्या 14 धावांवर बाद झाला. त्यानंतर, शुभमन गिल 2 धावांवर बाद झाला. त्यानंतर, छोटी पण स्फोटक खेळी खेळणाऱ्या जॉस बटलरला जोश हेझलवूडने बाद केले. मग रसिक सलामने एकाच षटकात निशांत सिंधू (5) आणि जेसन होल्डर (0) यांना बाद केले. गुजरात टायटन्सचा निम्मा संघ 51 धावांवर बाद झाला. त्यानंतर राहुल तेवतिया जीटीसाठी शेवटपर्यंत लढला, पण ते पुरेसे नव्हते, कारण संघाने सुरुवातीलाच खूप विकेट गमावल्या होत्या. गुजरातचा संपूर्ण डाव अवघ्या 19.3 षटकांत 162 धावांवर आटोपला. परिणामी, आरसीबीने 92 धावांनी हा सामना एकतर्फी जिंकला आणि फायनल गाठली.
गुजरात टायटन्सला अजून एक संधी (Gujarat Titans another chance For Final IPL 2026)
या लाजिरवाण्या पराभवानंतरही गुजरात टायटन्सचे स्पर्धेतील आव्हान संपलेले नाही. गुणतालिकेत अव्वल दोनमध्ये राहिल्याचा फायदा गुजरातला मिळणार असून त्यांना फायनलमध्ये पोहोचण्याची आणखी एक संधी उपलब्ध असेल. आता 27 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात ‘एलिमिनेटर-1’ चा सामना होणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, त्या विजेत्या संघासोबत गुजरात टायटन्सला क्वालिफायर-2 मध्ये भिडावे लागेल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.