रिलायन्सची पहिल्या तिमाहीत विक्रमी कमाई,गुंतवणूकदारांकडून विक्रीचं सत्र सुरु, शेअर गडगडला

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पहिल्या तिमाहीचे निकाल 18 जुलै रोजी जाहीर झाले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजनं पहिल्या तिमाहीत विक्रमी नफा मिळवला. रिलायन्सचा पहिल्या तिमाहीतील नफा 30681 कोटी रुपयांवर पोहोचला. याला एशियन पेंटसमधील भागीदारी विकून मिळालेल्या 8924 कोटी रुपयांचा आधार मिळाला. विक्रमी नफा कमावल्यानंतर देखील आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये घसरण झाली. रिलायन्सचा स्टॉक 47 रुपयांनी घसरला. रिलायन्सचा स्टॉक 3.24 टक्क्यांनी घसरुन 47.80 रुपयांनी घसरुन 1428.20 रुपयांवर आला.

रिलायन्सच्या स्टॉकमध्ये घसरण

रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक शुक्रवारी 1476 रुपयांवर होता. आज शेअर बाजार सुरु झाला तेव्हा स्टॉकमध्ये ट्रेडिंग 1465 रुपयांवर सुरु झालं. आजचं बाजाराचं सत्र संपलं तेव्हा स्टॉक 1428.60 रुपयांवर होता. म्हणजेच आज रिलायन्सचा स्टॉक 47.70 रुपयांनी घसरला.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं 18 जुलै रोजी आर्थिक वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. रिलायन्सचा नफा निव्वळ नफा 26994 कोटी रुपये इतका आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत या वर्षी नफा 78 टक्क्यांनी वाढला. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत रिलायन्सचा निव्वळ नफा 15238 रुपये होता.

रिलायन्स इंडस्ट्रीजचं इतर उत्पन्न पहिल्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 280 टक्क्यांनी वाढलं आहे. हे उत्पन्न 3983 कोटींवरुन 15119 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. इतर उत्पन्नात एशियन पेंटसमधील भागीदारी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून विकण्यात आली होती. त्यातून मिळालेल्या 8924 कोटी रुपयांचा समावेश आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी म्हटलं की रिलायन्सनं आर्थिक वर्ष 2026 च्या सुरुवातीला चांगलं वित्तीय प्रदर्शन करुन केली आहे. जागतिक बाजारात तेजी आणि घसरण असून देखील तिमाहीचा EBITDA गेल्या वर्षीच्या तुलनेत मजबूत राहिला.

रिलायन्सच्या चांगल्या कामगिरीनंतर देखील स्टॉक घसरल्यानं गुंतवणूकदार हैराण झाले. बाजारात अनेकदा ‘सेल ऑन न्यूज’ प्रवृत्ती दिसून येते. अनेकदा चांगली बातमी येण्यापू्र्वी शेअर खरेदी सुरु होते, बातमी आल्यानंतर नफा वसूल करण्यासाठी गुंतवणूकदार विक्री सुरु करतात. याच कारणामुळं रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण झाली असावी.

दरम्यान, सेन्सेक्समध्ये आज 442 अंकांची वाढ होऊन 82200.43 वर पोहोचला. निफ्टी 50 मध्ये 122.30 अकांची  वाढ होऊन तो 25090.70 वर पोहोचला आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.