लैंगिक छळ प्रकरणी काँग्रेस खासदार अकोइजाम यांना दिलासा
नवी दिल्ली
जेएनयूच्या लैंगिक छळ प्रकरणात काँग्रेस खासदार आणि प्राध्यापक अंगोमचा बिमोल अकोइजम यांना दिल्ली न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आणि 5 नोव्हेंबरपर्यंत दंडात्मक कारवाई न करण्याचे निर्देश दिले.जेएनयूने ऑक्टोबरमध्ये अकोइजम यांना बडतर्फ केले होते. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी या आदेशाला स्थगिती दिली. बडतर्फीनंतर दिल्ली पोलिसांनी 12 ऑक्टोबर रोजी त्यांच्याविऊद्ध गुन्हा दाखल केला होता. किमान 11 विद्यार्थिनींनी मे महिन्यात लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या होत्या. बैठकीच्या बहाण्याने विद्यार्थिनींना निवासस्थानी बोलावल्याचा आणि वर्गात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
Comments are closed.