निवडणूक आयुक्तांना हटवण्याचा ठराव विधानसभेत मंजूर.

वृत्तसंस्था/ तिरुवअनंतपुरम

निवडणूक आयोगाच्या कामकाजाविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केरळ विधानसभेने एक मोठा निर्णय घेतला आहे. इतिहासात पहिल्यांदाच केरळ विधानसभेने मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला आहे. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेली नवीन निवडणूक आयोग निवड समिती स्थापन करण्याची मागणी केरळ विधानसभेने केली आहे. तसेच एसआयआरमधील कथित अनियमितता दूर करण्याची मागणीही केली आहे.

निवडणूक आयोगावर उपस्थित केलेल्या प्रश्नांसंदर्भात केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली. आपल्या निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेशी आणि अखंडतेशी तडजोड केली जाऊ शकत नाही. मतदार यादीतील बदल, पात्र मतदारांना यादीतून वगळणे आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबाबत उपस्थित केलेल्या गंभीर चिंतांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी या ठरावाद्वारे अनेक मागण्या केल्या आहेत.

Comments are closed.