मुंबईचे नामवंत शरीरसौष्ठवपटू ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; सागर माळी यांचे निधन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईचे लोकप्रिय शरीरसौष्ठवपटू आणि ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ म्हणून ओळखले जाणारे सागर माळी यांचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराने निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर डायलेसिस सुरू होते, मात्र आज सकाळी त्यांची ही जीवघेणी झुंज संपली.

घरोघरी वर्तमानपत्रे टाकण्याचे काम करणाऱ्या सागर यांनी जिद्दीच्या बळावर शरीरसौष्ठव क्षेत्रात आपले नशीब घडवले. 2013 चा ‘मुंबई श्री’ किताब, 2014 च्या ‘मि. वर्ल्ड’ स्पर्धेत 85 किलो वजनी गटात मिळवलेला चौथा क्रमांक आणि ‘महाराष्ट्र श्री’ तसेच ‘भारत श्री’ मधील दमदार कामगिरीमुळे ते मुंबईच्या शरीरसौष्ठव जगतातील एक अत्यंत लक्षवेधी चेहरा बनले होते. त्यांच्या अकाली निधनाने क्रीडा वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात आई, वडील आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांचे कुटुंबीय परदेशातून परतल्यानंतर रविवारी (23 ऑगस्ट 2026) मुलुंड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Comments are closed.