Repo Rate : सलग तिसऱ्यांदा रेपो रेट जैसे थे, गव्हर्नर संजय मल्होत्रांची घोषणा, गृहकर्जदारांना दिलासा, Home Loan चा EMI जैसे थे राहणार
आरबीआय रेपो रेट मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी पतधोरण विषयक समितीच्या बैठकीनंतर रेपो रेट जाहीर केला. यावेळी त्यांनी गेल्या काही महिन्यात युद्धांमुळं निर्माण झालेली अनिश्चितता यासंदर्भात भाष्य केलं. सध्या निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीचं सखोल विश्लेषण केल्यानंतर रेपो रेट 5.25 टक्के कायम ठेवत असल्याचं संजय मल्होत्रा यांनी जाहीर केलं. आरबीआयनं सलग तिसऱ्यांदा रेपो रेट कायम ठेवत गृहकर्जदारांना दिलासा दिला आहे.
गृहकर्जदारांना दिलासा
आरबीआयकडून रेपो रेट कायम ठेवला जाईल अशी अनेकांना आशा होती. त्यानुसार रेपो रेट 5.25 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. यामुळं व्याजदरात कोणतीही वाढ होणार नाही. आरबीआयनं पतधोरण जाहीर करताना सलग तिसऱ्यांदा रेपो रेट कायम ठेवल्यानं गृहकर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेपो रेट कमी न केल्यानं किवा त्यात वाढ न केल्यानं गृहकर्जाचा ईएमआय कायम राहणार आहे.
(ही ब्रेकिंग न्यूज अपडेट होत आहे. लेटेस्ट अपडेटसाठी रिफ्रेश करा)
आणखी वाचा
Comments are closed.