प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही, सरकारी महिला कर्मचारी संतापली
प्रजासत्ताक दिन 2026 गिरीश महाजन: आज संपूर्ण देशात 77 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2026) मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना नाशिकमध्ये (Nashik) झालेल्या एका घटनेमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा आरोप झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणावर आता गिरीश महाजन यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गिरीश महाजन भाषण करत असताना बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याने वन विभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव या महिला कर्मचाऱ्याने थेट त्यांना जाब विचारला. या घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतले.
Republic Day 2026 Girish Mahajan: मी दिलगिरी व्यक्त करतो: गिरीश महाजन
या संपूर्ण घटनेनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले. गिरीश महाजन म्हणाले की, माझ्याकडून अनावधानाने राहिले असेल. माझा तसा कुठला हेतू नव्हता. मी फक्त घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय, माझ्याकडून अनावधानाने झाले असेल. माझा त्यात मुद्दामून नाव डावलण्याचा काहीही हेतू नाही. मी प्रत्येक वेळेस जेव्हा भाषण देतो, त्यावेळेस असे काही होत नाही. मात्र मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Republic Day 2026 Girish Mahajan: “सस्पेंड केलं तरी चालेल, पण माफी मागणार नाही”: माधवी जाधव
दरम्यान, या घटनेनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना माधवी जाधव म्हणाल्या की, गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही. जो व्यक्ती संविधानाला कारणीभूत आहे. याला तुम्ही संपवायला निघाले. मंत्र्यांची चूक आहे. मी माफी मागणार नाही. मंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी देणं घेणं नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन. माती काम करेन. पण मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं असेल तर करू शकता. बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. मी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या तारखांना मानत नाही. पण लोकशाही मानते, असे त्यांनी म्हटले.
माधवी जाधव पुढे म्हणाल्या की, बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल, याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचं नाव भाषणात आलं नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.