नोकर भरतीत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, 70 टक्के जागा ठेवणार राखीव, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : भूमिपुत्रांसाठी फडणवीस सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील नोकर भरतीत भूमिपुत्रांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील मूळ रहिवाशांसाठी 70 टक्के जागा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सहकार विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
बँकांचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील तरुणांना पदभरतीत प्राधान्य मिळणार
बँकांचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील तरुणांना पदभरतीत प्राधान्य मिळणार आहे. 30 टक्के जागा या जिल्ह्या बाहेरील उमेदवारांसाठी देता येणार आहेत. पदभरतीची जाहिरात काढलेल्या बँकांना ही आदेश लागू असणार आहेत. राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आदेश लागू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्याच जिल्ह्यात नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळं फडणवीस सरकारनं घेतलेला निर्णय मोठा मानला जात आहे.
राज्यात सध्या 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत
राज्य सरकारने स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार देण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील रिक्त पदांची भरती करताना आता संबंधित जिल्ह्यातील स्थानिक भूमिपूत्रांना संधी दिली जाणार आहे. राज्यात सध्या 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत आहेत. या प्रामुख्याने शेतकरी आणि ग्रामीण विकास संस्थांशी जोडलेल्या आहेत. या जिल्हा सहकारी बँकांचे कार्यक्षेत्र आणि सभासद त्या-त्या विशिष्ट जिल्ह्यापुरतेच मर्यादित असते. या बँकांना स्थानिक बोलीभाषा, भौगोलिक परिस्थिती आणि ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असलेले कर्मचारी मिळाल्यास या बँकांच्या ग्राहकांना आणि सभासदांना चांगली दर्जेदार सेवा देता येईल. या उद्देशाने सरकारने हा बदल केला आहे.
शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा तसेच इतर सुविधा मिळताना येणाऱ्या विविध अडचणी दूर होतील
जिल्हा मध्यवर्ती बँकांची ओळख ही विकास संस्थांच्या मातृसंस्था अशी असते. गावातील विकास संस्थांचे अस्तित्व या बँकांवर अवलंबून असते. स्थानिक तरुणांची भरती झाल्याने बँकेचा कारभार अधिक लोकाभिमुख होईल आणि शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा तसेच इतर सुविधा मिळताना येणाऱ्या विविध अडचणी दूर होतील, असा विश्वास सहकार विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळं राज्य सरकारने स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार देण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. . राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील रिक्त पदांची भरती करताना आता संबंधित जिल्ह्यातील स्थानिक भूमिपूत्रांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळं तरुणांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.