पंजाब काँग्रेसमध्ये फेरबदल; बाजूला सारले खासदार मनीष तिवारी नाराज.

चंदीगड : काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी गुरुवारी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. काँग्रेसने पंजाबसाठी नवे कार्यकारी अध्यक्ष आणि निवडणूक समित्यांची घेषणा केली असताना तिवारी यांनी ही पोस्ट केली आहे. काँग्रेसने तिवारी यांना पंजाब निवडणुकीकरता कुठलीही जबाबदारी सोपविणे टाळले आहे. व्यक्ती आणि संस्थांना वाटणाऱ्या असुरक्षिततेबद्दल माझ्याकडे कुठलाही उपचार असायला हवा होता. तरीही काँग्रेसने मागील 45 वर्षांमध्ये मला खूप काही दिले आहे आणि मी दशकांपासून स्वत:चे पूर्ण जीवन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सेवेत समर्पित केले आहे. यापुढे काय होईल ते पाहू, असे तिवारी यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे. काँग्रेसने पंजाब निवडणुकीसाठी राज्यातील पक्षसंघटनेत महत्त्वपूर्ण फेरबदल केले आहेत. यात अनेक निवडणूक संबंधी समित्यांचे अध्यक्ष आणि सहअध्यक्ष जाहीर करण्यात आले आहेत. तर चंदीगडचे खासदार आणि राज्यातील पक्षाचे प्रमुख नेते मनीष तिवारी यांना कुठलीच संघटनात्मक जबाबदारी सोपपिवण्यात आलेली नाही.

Comments are closed.