IPL: सीएसकेमध्ये हार्दिक पांड्याची एन्ट्री? समोर आली मोठी अपडेट…

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघात सामील होणार का, याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्टार भारतीय अष्टपैलू खेळाडूच्या संघात सामील होण्याबाबतच्या चर्चांवर सीएसकेचे (CSK Trade News) सीईओ काशी विश्वनाथन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

CSK सीईओ काशी विश्वनाथन) यांनी क्रिकबझला सांगितले, “आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा या विषयावर कोणताही सक्रिय विचारही केलेला नाही. ट्रेडसाठी कोणते खेळाडू उपलब्ध आहेत याची आम्हाला कल्पना आहे, परंतु हंगामाचा आढावा पूर्ण झाल्यानंतरच आम्ही यावर चर्चा करू. हा आढावा सध्या सुरू असलेल्या एमएलसी (MLC) स्पर्धेनंतर घेतला जाईल; त्यासाठी अजून बराच वेळ आहे.” मुंबई इंडियन्सची भूमिका अधिक स्पष्ट होती. फ्रँचायझीच्या प्रवक्त्याने सांगितले, “आम्ही सध्या खेळाडूंच्या ट्रेडबाबत कोणत्याही चर्चेत सहभागी नाही आहोत. अशा चर्चा आढावा पूर्ण झाल्यानंतरच होऊ शकतात.”

थोडक्यात सांगायचे तर, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाने हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya Trade) ट्रेडबाबत कोणतीही चर्चा सुरू असल्याचे किंवा तसा कोणताही प्रस्ताव अस्तित्वात असल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे.

हार्दिक पांड्या हा आयपीएलमधील (Hardik Pandya IPL Stats) सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे, त्याने आतापर्यंत 162 आयपीएल सामन्यांमध्ये 146.29च्या स्ट्राईक रेटने आणि 27.88 च्या सरासरीने 2955 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 10 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 91 धावा आहे. त्याने स्पर्धेत आतापर्यंत 228 चौकार आणि 155 षटकार ठोकले आहेत. याव्यतिरिक्त, त्याने गोलंदाजीमध्येही उत्कृष्ट कामगिरी करत 162 सामन्यांत 83 विकेट्स घेतले आहेत.

Comments are closed.