दोन वर्षीय चिमुरडीला गाडीखाली चिरडणाऱ्या डॉटरला पोलिसांकडून अभय? केवळ गुन्हा दाखल, अटक टाळली, आ

Pune Accident News आळंदी : पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) धडा घेतला नाहीये च्या? असा प्रश्न विचारण्याची वेळ सध्या आली आहे. कारण आळंदीत दोन वर्षीय चिमुरडीला चिरडणाऱ्या (Accident New) डॉक्टरला चक्क पोलिसांनी अटकेपासून संरक्षण दिलंय. 26 वर्षीय चालक डॉक्टर प्रथमेश कोकणेने श्रुतिका मिरासेला धडक दिली. आधी पुढच्या आणि मग मागच्या चाकाखाली आल्यानं श्रुतिकाचा जागीचं दुर्दैवी मृत्यू झाला. उपस्थितांनी डॉक्टरला रोखण्याचा प्रयत्न देखील केला. पण डॉक्टरने गाडीसह धूम ठोकली. मात्र उपस्थितांनी त्याचा पाठलाग केला आणि पुढं चिंबळी फाट्याला त्याला पकडण्यात यश आलं.

त्यानंतर त्याला आळंदी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. अपघाताची संतापजनक दृश्य सीसीटीव्हीत कैद झालीत. जे घडलं ते या दृश्यात स्पष्टपणे दिसतंय. असे असताना मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला सोडून दिलं. आमच्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही, दाखल गुन्ह्यात अटकेची तरतूद नाही, अशी कारणं पोलिसांकडून दिली जातायेत. सीसीटीव्हीत जे दिसतंय तो पुरावा पोलिसांच्या दृष्टीने तकलादू असावा. त्यामुळंच पोलिसांच्या भूमिकेवर चहुबाजूंनी टीका केली जातीये. पोर्श प्रकरणाने पोलिसांची प्रतिमा आधीचं मलिन झालीये, त्यातून आळंदी पोलिसांनी काही धडा घेतला नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

Pune News : पालकांनो लक्ष द्या, आपलं पोरगं काय करतंय बघा! पुण्यात एकाच दुचाकीवर बालकांची ‘चौबल’ सीट स्वारी

पुण्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एकाच दुचाकी वरून 4 अल्पवयीन राईड मारत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. शिवसेनेच्या माथाडी कामगार सेने चे अध्यक्ष निलेश माझिरे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. पुण्यातील वारजे भागातील हा व्हिडिओ असून एक शाळकरी मुलगा त्याच्या तीन मित्रांना घेऊन एक दुचाकी चालवत असल्याचा हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये त्यांना प्रश्न विचारले असता सगळे हसताना खिदळताना दिसतायत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पालकांनी आपली दुचाकी आपल्या पाल्यांना देताना एकदा विचार करावा असं मत आता व्यक्त केलं जात आहे. संबंधित तरुण हे अल्पवयीन असले तरी वाहतूक पोलीस, आरटीओ प्रशासन संबंधित वाहन मालकावर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.