मोठी बातमी : विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव!
छत्रपती संभाजिनगर: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह परभणीत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले .गेल्या दोन महिन्यांपासून या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणाला वेग आला असून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर आता थेट साहित्य संमेलनापर्यंत पोहोचला आहे . छत्रपती संभाजी नगर मध्ये भरलेल्या 19व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याबाबत ठराव मांडला गेला . मराठवाड्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोहोचलेले गुन्हेगार यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी .चौकशी निपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावे असा ठराव नाव न घेता संमत करण्यात आला . (Santosh Deshmukh)
काय मांडण्यात आला ठराव ?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 19 व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारी सुरुवात झाली .शहरातील आमखास मैदानावर सुरू झालेल्या या साहित्य संमेलनात परिसंवाद कवी संमेलने व्याख्यान गटचर्चा यांची रेलचल होती .दरम्यान ,सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून तसेच परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू करण्याचे पडसादही विद्रोही साहित्य संमेलनात दिसले .यात थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव मांडण्यात आला .
प्रस्ताव क्रमांक 20 : मराठवाड्यातील परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीतील मृत्यू प्रकरणी दोषी पोलीस संतोष देशमुख कोण प्रकरणातील सत्ता वर्तुळाचे पोहोचलेले गुन्हेगार यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी चौकशी निपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रीपदापासून दूर राहावे .असे या प्रस्तावाचे स्वरूप होते . ‘
https://www.youtube.com/watch?v=PKBLVPTDDB0
धनंजय मुंडेंविरोधात हायकोर्टात सुनावणी
एकीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. दुसरीकडे करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडें विरोधात विधानसभा निवडणुकीत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती .या तक्रारीवरून धनंजय मुंडे यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती .याबाबत आज परळीच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.मंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज सोबतच्या शपथपत्रात ,पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता .मात्र करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कोणताही उल्लेख केला नव्हता .त्यांनी ही माहिती दडवल्याबाबत करुणा शर्मांनी तक्रार केली होती .
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.