राज्यात जाहिरात फलकावर निर्बंध; आता 40 फुटाची मर्यादा, इमारतीची गच्ची, आवाराच्या भिंतींवर फलक
मुंबईत फ्लेक्सची जाहिरात करा: मुंबईसह राज्यात जाहिरात फलकांवर अनेक निर्बंध (Restrictions on Flex) येणार असून, जास्तीत जास्त 40 फूट बाय 40 फूट आकाराचाच जाहिरात फलक लावता येणार आहे. मर्यादेपेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक हटविण्यात येणार आहेत. इमारतींची गच्ची, आवाराची भिंत यावर जाहिरात फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत सर्व महापालिका, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यासह विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी एक महिन्यात कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
घाटकोपर येथील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर राज्य सरकारने (Maharashtra Goverment On Flex) नियुक्त केलेल्या माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल आणि कृती अहवाल राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी स्वीकारला आहे. घाटकोपर येथे 13 मे 2024 रोजी वारा व मुसळधार पावसामुळे प्रचंड आकाराचा जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला होता. या दुर्घटनेत 17 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरातील अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा चर्चेत आला होता.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्देश- (Advertise Flex In Mumbai)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली काल (23 सप्टेंबर) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक (Maharashtra Cabinet Meeting) घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये जाहिरात फलकांवर अनेक निर्बंध घालण्याचा निर्णयही घेण्यात आला. मुंबईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती श्री. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल, शिफारशींसह स्वीकारला. तसेच अहवालातील निष्कर्ष, समितीने सुचविलेल्या उपाययोजनांवरील कार्यवाहीचा कृती अहवाल स्वीकारला. यावर संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे निर्देश काल (23 सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आले.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.