परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या, कैलास फडवर गुन्हा दाखल होताच अंजली दमानियांची मोठी मागणी,
बीड: नकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी परळी शहरातील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. परळी मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या बॉडीगार्डला मतदान केंद्रात जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. तसेच कोण पोलिस?, कशाचा बॉडीगार्ड असं म्हणत मध्ये कोणीही जायचं नाही म्हणून अंगरक्षकाला बाहेर काढण्यात आलं होतं, नेते माधव जाधव यांनाही मारहाण करण्यात आली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीड पोलिसांनी तब्बल अडीच महिन्यांनंतर याची दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणात कैलास फड, त्याचा मुलगा आणि इतर पाच जणांवर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास फड हा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा कार्यकर्ता आहे. या कारवाईनंतर समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत मोठी मागणी केली आहे.
अंजली दमानिया यांनी परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या. किती मतदान झाले ते कळेल अशी मागणी केली आहे, त्याचबरोबर त्यांनी एसपी नवनीत कावत यांचे आभार देखील मानले आहेत.
अंजली दमानिया यांनी सोशल मिडिया पोस्ट
“अखेर 82 दिवसानंतर गुन्हा दाखल! कैलाश फड आणि त्यांच्या मुलावर अखेर गुन्हा दाखल, विधान सभा निवडणुकीत परळी येथे मोठ्या प्रमाणावर गौडबंगाल झाला हे आता स्पष्ट झाले आहे. इलेक्शन कमिशन कडे असे २० ते २५ तक्रारीचे वीडियो आहेत. त्यातील प्रत्येक वीडियो वर कारवाई करा. परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या. किती मतदान झाले ते कळेल एसपी नवनीत कावत यांचे आभार”, अशी पोस्ट अंजली दमानिया यांनी शेअर केली आहे.
अखेर ८२ दिवसानंतर गुन्हा दाखल !
कैलाश फड आणि त्यांच्या मुलावर अखेर गुन्हा दाखल
विधान सभा निवडणुकीत परळी येथे मोठ्या प्रमाणावर गौडबंगाल झाला हे आता स्पष्ट झाले आहे.
इलेक्शन कमिशन कडे असे २० ते २५ तक्रारीचे वीडियो आहेत. त्यातील प्रत्येक वीडियो वर कारवाई करा.
परळीतील निवडणूक… https://t.co/x0shmhap70
– श्रीमती अंजली दमानिया (@अंजली_दमानिया) 12 फेब्रुवारी, 2025
नेमकं प्रकरण काय?
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2024 च्या मतदानाच्या दिवशी परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. याच दरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना ऍड. माधव जाधव यांना तीन ते चार जणांनी मारहाण केली. माधव जाधव यांना परळी मध्ये मारहाण झाल्यानंतर त्याची पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदुर या ठिकाणी झाले. घटनांदूर मधील मतदानकेंद्रामध्ये मतदान चालू असतानाच काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून मतदान केंद्राची तोडफोड केली होती.
परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मतदानादिवशी राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास फड आणि त्याच्या साथीदाराने मारहाण केली होती. मारहाण झाल्यानंतर माधव जाधव यांनी पोस्टाद्वारे तक्रार नोंदवली होती. याच प्रकरणात राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असलेल्या पोलीस गार्डचा जबाब घेण्यात आला. त्यानुसार कैलास फडच्या विरोधामध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल अडीच महिन्यांनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://www.youtube.com/watch?v=bdpecvrregs
अधिक पाहा..
Comments are closed.