पंतच्या ‘त्या’ एका मास्टर स्ट्रोकमुळे मध्यरात्री मॅचचा निकालच बदलला; नेमकं काय घडलं?

LSG ने RCB चा 9 धावांनी पराभव केला DLS IPL 2026 : इकाना स्टेडियमवर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने आरसीबीवर नाट्यमय विजय मिळवला. शेवटच्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 20 धावांची गरज असताना मैदानावर जबरदस्त हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मात्र अशा दबावाच्या क्षणी कर्णधार ऋषभ पंतने घेतलेला एक धाडसी निर्णय लखनऊसाठी ‘गेमचेंजर’ ठरला.

शेवटच्या षटकात पंतचा मास्टरस्ट्रोक

अखेरचे षटक टाकण्यासाठी अनुभवी शाहबाज अहमद आणि युवा फिरकीपटू दिग्वेश सिंग राठी दोघेही सज्ज होते. सुरुवातीला पंत शाहबाजकडे चेंडू सोपवणार होता. पण मिचेल मार्शसोबत चर्चा केल्यानंतर त्याने अचानक निर्णय बदलला आणि दिग्वेश राठीवर विश्वास दाखवला. या निर्णयामुळे शाहबाज अहमद स्पष्टपणे नाराज दिसला. त्याने पंतकडे हट्टाने चेंडू मागितला. परिस्थिती इतकी तापली की, मैदानातच ऋषभ पंतला शाहबाजला सुनवावे लागले. मात्र पंत आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि शेवटी चेंडू राठीलाच देण्यात आला.

दिग्वेश राठीने फिरकीत अडकवले आरसीबीला

पंतचा हा डाव अचूक ठरला. दिग्विजय राठीने दबावाच्या क्षणी अप्रतिम गोलंदाजी करत आरसीबीच्या फलंदाजांना पूर्णपणे रोखून धरले. रोमारियो शेफर्ड आणि कृणाल पंड्यासारख्या धडाकेबाज फलंदाजांनाही त्याने एकही षटकार मारू दिला नाही. राठीने अखेरच्या षटकात फक्त 10 धावा दिल्या आणि आरसीबीचा पराभव झाला. अखेरीस लखनऊने हा सामना 9 धावांनी जिंकत प्ले-ऑफच्या आशा जिंवत ठेवल्या.

पंतचा निर्णय ठरला विजयाचा हिरो

जर ऋषभ पंतने शाहबाजची मागणी मान्य केली असती, तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता. पण युवा दिग्वेश राठीवर दाखवलेला विश्वास लखनऊसाठी सुवर्णक्षण ठरला. राठीने आपल्या अचूक गुगली आणि शांत स्वभावाने दबाव झेलत सामना लखनऊच्या बाजूने फिरवला. हा विजय केवळ दोन गुणांचा नव्हता, तर ऋषभ पंतच्या नेतृत्वाची आणि योग्य वेळी घेतलेल्या धाडसी निर्णयाची मोठी परीक्षा होती आणि त्यात तो पूर्णपणे यशस्वी ठरला.

हे ही वाचा –

Virat Kohli Wicket Prince Yadav : चेसमास्टर विराट कोहली शून्यावर बाद, प्रिन्स यादवचा बॉल कोहली पाहत राहिला अन् स्टम्प उडाले, सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

आणखी वाचा

Comments are closed.