IPL 2027 पूर्वी हाय-प्रोफाईल डील; 12 कोटींचा तोटा सहन करून ऋषभ पंतची ‘घरवापसी’, कुलदीप यादव लखनऊच्या संघात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इंडियन प्रीमियर लीगचा 19 वा हंगाम संपल्यानंतर मोठ्या नाट्यमय घडामोड पाहायला मिळत आहेत. यंदाच्या हंगामात सुमार कामगिरीनंतर ऋषभ पंतने लखनऊ सुपर जायंट्स संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर तो पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये घरवापसी करू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्यात हाय-प्रोफाइल ट्रेड झाला आहे. यामुळे दोन्ही संघांचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे.

आयपीएल 2025 मेगा लिलावात लखनऊने पंतला तब्बल 27 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून संघात घेतले होते. आयपीएल इतिहासातील ही सर्वात मोठी बोली ठरली होती. आता दिल्लीत परतताना पंतच्या मानधनात 12 कोटींची मोठी कपात झाली असून त्याला 15 कोटी रुपये मिळतील. ऋषभ पंत पुन्हा एकदा आपल्या जुन्या फ्रेंचायझीमध्ये परतला असून याआधी 8 वर्षे त्याने दिल्लीचे प्रतिनिधित्व केले आहे.

पंतच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्सला 2025 आणि 2026 या दोन्ही हंगामांत प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. दोन्ही हंगामात पंतच्या बॅटमधील धावा आटल्या होत्या. 2025 च्या हंगामात पंतला 13 डावांत केवळ 269 धावा करता आल्या. तर 2026 च्या हंगामातही त्याला केवळ 312 धावा करता आल्या होत्या. पंतच्या कामगिरीचा परिणाम संघावरही झाला आणि लनखऊ प्ले ऑफ गाठू शकला नाही. यानंतर 29 मे रोजी कर्णधारपद सोडणअयाचा निर्णय घेतला.

Comments are closed.