डील डन! आयपीएल 2027 हंगामासाठी ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्समध्ये, कुलदीप यादव लखनऊमध्ये सामील

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्समध्ये परतणार आहे, तर फिरकीपटू कुलदीप यादव लखनऊ सुपर जायंट्स संघात सामील होईल. ही आयपीएलच्या अलीकडच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण खेळाडूंची अदला-बदल (ट्रेड) ठरली आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामानंतर पंतने लखनऊच्या कर्णधारपदाचा त्याग केला होता.

लखनऊने आयपीएल २०२५ च्या लिलावात पंतला २७ कोटी रुपयांना विकत घेतले होते, जी आयपीएलच्या इतिहासातील सर्वाच्च बोली आहे. आता तो १५ कोटी रुपयांमध्ये दिल्लीत परतला आहे. तसेच कुलदीप यादव १३.५० कोटी रुपयांच्या मोबदल्यात लखनऊमध्ये सामील झाला.

पंत त्या फ्रँचायझीमध्ये परतत आहे जिथे त्याने २०१६ ते २०२४ दरम्यान नऊ हंगाम घालवले आणि १११ सामने खेळले. तो दिल्लीसाठी सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. जवळपास एक दशकापासून फ्रँचायझीच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेल्या पंतने २०२१ ते २०२४ या चार हंगामांमध्ये ४३ सामन्यांमध्ये संघाचे कर्णधारपदही भूषवले. दुसरीकडे दिल्लीसोबत पाच हंगाम खेळल्यानंतर कुलदीप लखनऊ संघात सामील झाला आहे. २०२२ मध्ये या फ्रँचायझीमध्ये आल्यापासून, या डावखुरा फिरकी गोलंदाजाने ६५ सामन्यांमध्ये ७२ विकेट्स घेतले आहेत आणि स्पर्धेतील सर्वात प्रभावी बळी घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक म्हणून स्वतःला स्थापित केले आहे.

भारताच्या प्रमुख व्हाईट-बॉल गोलंदाजांपैकी एक असलेला कुलदीप, त्याच्या सध्याच्या १३.५० कोटी रुपयांच्या शुल्कावर लखनऊ संघात सामील होईल.

हा ट्रेड कुलदीपसाठी घरवापसी ठरेल. त्याने उत्तर प्रदेशकडून देशांतर्गंत क्रिकेट खेळले आहेत, तर पंत दिल्लीचा खेळाडू राहिला आहे. पंतच्या ट्रेडमागचे खरे कारण समोर आले नाही, मात्र लखनऊ संघ आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत १० व्या आणि २०२५ मध्ये सातव्या स्थानावर होता. या दोन्ही हंगामांमध्ये पंत कर्णधार होता. ही निराशाजनक कामगिरी पाहता संघय व्यवस्थापनाला बदल हवा होता, त्यामुळेच हा ट्रेड केला असण्याची शक्यता आहे. त्याने या दोन हंगामामध्ये २८ सामने खेळताना ५८१ धावा केल्या.

Comments are closed.