आधी मामा म्हणून ओळख सांगितली, नंतर म्हणाला, शारीरिक संबंध ठेवू दे, गळा चिरून तुला विहिरीत टाकेन
रिसोड (जि. वाशिम): पुण्यातील स्वारगेट येथील बस डेपोमध्ये घडलेली अत्याचाराची घटना ताजी असतानाच दुसरीकडे रिसोड (जि. वाशिम) येथे एका धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना गुरुवारी दुपारी रिसोड (जि. वाशिम) येथे घडली आहे. गुन्हा दाखल झालेल्या अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत घडलेली सर्व घटना सांगितली आहे. अल्पवयीन मुलगी कॉम्प्युटर क्लासमधून घरी जात होती. अनोळखी व्यक्ती जवळ आला. मी तुझ्या वडिलांचा मावसभाऊ आहे, तुझे मामा मला ओळखतात. माझ्या घरी चल, माझी मुलगी तुला भेटायला इच्छुक आहे. असे सांगून त्याने तिला ऑटोरिक्षात बसविले. त्यानंतर त्याने तिला निर्जनस्थळी घेऊन गेला, त्यानंतर तिला चाकूचा धाक दाखवत धमकी दिली. शारीरिक संबंध ठेवू दे, अन्यथा मी तुझा गळा चिरून तुला विहिरीत टाकून देईन अशी धमकी दिली. या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू आहे.
कॉम्प्युटर क्लासवरुन घरी जाणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून अतिप्रसंग केल्याची घटना समोर आली आहे. रिसोड शहरापासून जवळ असलेल्या वाकद परिसरात ही घटना घडली आहे. तिने सांगितले की, मी तुझ्या वडिलांचा मावस भाऊ आहे. तुझे मामा मला ओळखतात, तू माझ्या घरी चल, माझी मुलगी तुला भेटण्यासाठी इच्छुक आहे, अशा प्रकारे तिला फूस लाऊन तिला ऑटो रिक्षातून रिसोड वाशिम मार्गावरील वाकद शेत असलेल्या भागात निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथे तरुणीला चाकूचा धाक दाखवून 45 वर्षीय नराधमाने अत्याचार केला आहे. अत्याचार करून मुलीला घटनास्थळी सोडून आरोपी फरार झाला आहे. अशा फिर्यादीवरून रिसोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रिसोड येथील अत्याचार घटनेतील नराधम आरोपी फरार आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्या आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी आठ पोलीस पथकं रवाना झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.