चीन,इराणने मोठा गेम केला, आता डॉलरचे अवमूल्यन होणार; रॉबर्ट कियोसाकी यांचा धोक्याचा इशारा
‘रिच डॅड, पुअर डॅड’ या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांची एक नवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या नव्या पोस्टमधील त्यांनी अमेरिकेला धोक्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. इराणशी युद्ध करणे अमेरकेला महागात पडू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. आता इराण आणि चीनने केलेल्या खेळीमुळे डॉलरची स्थिती आणखी बिघडत आहे आणि डॉलरचे अवमूल्यन होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत त्यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी सोने, चांदी, बिटकॉइन किंवा इथेरियममध्ये गुंतवणूक करण्याबद्दल कोणताही सल्ला दिला नाही. तर त्यांनी लोकांना त्यांचे आर्थिक ज्ञान वाढवण्याचे आवाहन केले आणि रे डॅलिओ यांचा पॉडकास्ट ऐकण्याचा सल्ला दिला. जेणेकरून ते कोणत्याही आर्थिक संकटावर मात करू शकतील.
त्यांनी पोस्टमध्ये अमेरिका-इराण युद्धामुळे बिघडत चाललेल्या परिस्थितीचा उल्लेख केला. त्यांनी लिहिले, इराणमधील परिस्थिती युद्धापेक्षाही वाईट आहे. अमेरिकन डॉलरचे अवमूल्यन होण्याची भीती आहे. इराणने कच्च्या तेलासाठी चिनी युआनमध्ये पैसे स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. याचा अमेरिकन डॉलरच्या भविष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
त्यांनी जागतिक परिस्थिती आणि डॉलरच्या पतनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच लोकांना आपली आर्थिक ज्ञान वाढवण्याचा आणि या कामात दररोज सुमारे एक तास गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. कियोसाकी यांनी लिहिले, मी तुम्हाला रे डॅलिओ यांचा ‘इराणने पेट्रोडॉलरला मारले’ हा पॉडकास्ट ऐकण्याचा आग्रह करतो. ही जागतिक आर्थिक इतिहासातील सर्वात मोठी बातमी आहे आणि डॅलिओ यांच्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कोणीही हे समजावून सांगत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
तुमची सर्वोत्तम गुंतवणूक ही तुमच्या आर्थिक शिक्षणात केलेली गुंतवणूक आहे. असे शिक्षण जे आपल्या शाळा कधीच शिकवणार नाहीत.” स्वतःची काळजी घ्या. यापूर्वी शनिवारी, त्यांनी एक सूचना आणि इशारा दिला होता की सर्वात मोठे आर्थिक संकट येत आहे, त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करा, ज्यांच्या किमती येत्या काळात झपाट्याने वाढणार आहेत. यासोबतच, जिम रिचर्ड्स यांच्या भाकिताचा संदर्भ देत त्यांनी पुढे लिहिले की, सोन्याचा भाव (गोल्ड रेट) येत्या काळात $100,000 पर्यंत पोहोचेल, तर सध्या तो प्रति औंस $4,500 आहे.
Comments are closed.