ट्रेंड – रोबोची धुमश्चक्री

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आर्टिफिशियल इंटॅलिजन्स (एआय) आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. मात्र जर ही यंत्र आपली ऑर्डर्स ऐकत नसतील तर? सोशल मीडियावर इंडोनेशियामधील व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक ह्युमनॉइड रोबो अचानक हात-पाय हलवत समोरच्यावर अटॅक करू लागतो.  काही जण रोबोची चाचणी करत असतात, मात्र काही क्षणांतच रोबो अनियंत्रित होऊन लाथा मारू लागतो. या रोबोला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्नही केला जातो. हा व्हिडीओ kaff_digital या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटिझन्सनी व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. काहींनी ‘सोमवारच्या मीटिंगचा राग काढत असावा’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हायरल व्हिडीओतील प्रकार तांत्रिक बिघाडामुळे झाला की तो चाचणीचा भाग होता, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

Comments are closed.