आमचे रोहितदादा पाठपुरावा करताय, पण अधिवेशनात अजितदादांच्या मृत्यूबाबत सर्वपक्षीय आमदारांनी सरका
अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहिणी खडसे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death) यांच्या मृत्यूचं गूढ समोर आणण्यासाठी सर्व पक्षीय आमदारांनी अधिवेशनात जाब विचारावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केली आहे. तसेच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असताना अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
रोहिणी खडसे एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. मला आशा आहे की या अधिवेशनात राज्यातील महिला-मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणांवर चर्चा होऊन या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस निर्णय होईल. भारत आणि अमेरिकेत जो व्यापार करार झाला आहे. त्याबाबत सरकार उत्तर देईल आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संरक्षण देईल. भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारामुळे पडणारे पूल, खचणारे रस्ता यावर काही तरी ठोस उपाययोजना होईल तसेच भ्रष्टाचाऱ्यांना चाप बसवली जाईल. राज्यातील बंद पडणाऱ्या मराठी शाळा, कोसळलेली आरोग्य यंत्रणा, बेरोजगारी, परराज्यात जाणारे उद्योगधंदे यावर उत्तर मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.
Rohini Khadse on Ajit Pawar Death Plane Crash : सर्व पक्षीय आमदारांनी अधिवेशनात जाब विचारावा
रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या मृत्यूचे गूढ उकलेल तसे न झाल्यास आमचे रोहित दादा पवार तर पाठपुरावा करतच आहे. पण, सर्व पक्षीय आमदार देखील याबाबत सरकारला सभागृहात जाब विचारेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.
महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. मला आशा आहे की या अधिवेशनात
– राज्यातील महिला-मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणांवर चर्चा होऊन या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस निर्णय होईल
– भारत आणि अमेरिकेत जो व्यापार करार झाला आहे. त्याबाबत सरकार उत्तर देईल आणि… pic.twitter.com/ZFuRnEbUxp
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) 23 फेब्रुवारी 2026
Ajit Pawar Death Plane Crash: अपघाताची पार्श्वभूमी
दरम्यान, 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. विमान धावपट्टीवर उतरताना कोसळले आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी 29 जानेवारीला बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी काही मुद्दे मांडले होते. त्यांच्या मते, अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते त्या विमानात गरजेपेक्षा जास्त इंधन होते, त्यामुळे स्फोट अधिक मोठा झाला. तसेच वैमानिक सुमित कपूर यांनी विमान मुद्दाम जमिनीवर आदळले असावे, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या दुर्घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य समोर यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.