रोहित आर्यच्या शरीरात नेमक्या किती गोळ्या घुसल्या? जे.जे. रुग्णालयात डॉक्टरांकडून पोस्टमार्टेम


रोहित आर्य सामना: मुंबईच्या पवई परिसरात 17 जणांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य या व्यक्तीचा गुरुवारी मुंबई पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला होता. काल दुपारी पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केल्यानंतर रोहित आर्य (Rohit Arya) याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सहा वाजता जे.जे. रुग्णालयात आणण्यात आला. आता याठिकाणी रोहित आर्य याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. आज सकाळी रोहित आर्य याचा मृतदेह जे.जे. रुग्णालयात(J J Hospital) आणल्यानंतर प्रथम त्याचा एक्स-रे काढण्यात आला. आता एक तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक रोहित आर्य याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करतील. त्याच्या शरीरात नेमक्या किती गोळ्या आहेत, त्याचा मृत्यू कशामुळे झाला, याचा अहवाल हे डॉक्टरांचे पथक पोलिसांना देईल. (Powai Police Encounter)

रोहित आर्य याने 17 मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलीस, शीघ्रकृती दल, दहशतवादविरोधी पथक आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मुलांना ओलीस ठेवण्यात आलेल्या आर.के. स्टुडिओची इमारत बंदिस्त होती. रोहित आर्य याने सभागृहाला सेन्सर लावले होते. त्याच्याकडे एअर गन आणि ज्वलनशील पदार्थ होते. अखेर पोलिसांनी स्वच्छतागृहाची खिडकी तोडून स्टुडिओत प्रवेश केला. यानंतर पोलिसांनी मुंबई पोलिसांची सुटका करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रोहित आर्य त्याठिकाणी आला आणि त्याने पोलिसांवर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारे यांनी रोहित आर्य याच्या दिशेने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून एक गोळी झाडली. ही गोळी रोहित आर्यच्या छातीत डाव्या बाजूला लागली. त्यामुळे रोहित आर्य गंभीर जखमी झाला आणि संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

Mumbai Powai Encounter news: पोलिसांनी मुलांना नेमकं कसं वाचवलं?

रोहित आर्य याने पवईच्या आर.के. स्टुडिओमध्ये शासकीय जाहिरातीच्या ऑडिशनसाठी मुलांना जमा केले होते. दुपारी एक वाजता रोहित आर्य याने मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रोहितशी संवाद साधत त्याला संभाषणात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका पथकाने बाथरूमच्या मार्गे आत प्रवेश करून मुलांना वाचवण्याची धाडसी योजना आखली. मात्र, रोहितने मुलांच्या डोक्याला बंदूक लावण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर फायरिंग करण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांकडून प्रत्युत्तरादाखल गोळीबार करण्यात आला. यावेळी पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारे यांनी झाडलेली गोळी रोहितच्या छातीच्या डाव्या बाजूस लागली. तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला ट्रॉमा सेंटरला हलवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आणखी वाचा

एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारतानाचे फोटो, रोहित आर्य ज्या योजनेमुळे आयुष्यातून उठला ती महत्त्वाकांक्षी सरकारी योजना नेमकी काय होती?

आणखी वाचा

Comments are closed.