रोहित आर्य खाली वाकला अन् गोळी छातीत शिरली हे पोलिसांचं स्पष्टीकरण हास्यास्पद, फेक एन्काऊंटरचा


मुंबईत रोहित आर्य चकमक: मुंबईच्या पवई परिसरात 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य याचा मुंबई पोलिसांनी केलेला एन्काऊंटर (Mumbai Police encounter) बनावट होता. पोलिसांना रोहित आर्य याच्या हात किंवा पायावर गोळी मारणे शक्य होते. मात्र, डीसीपी अमोल वाघमारे (Amol Waghmare) यांना हिरो व्हायचे असल्याने त्यांनी रोहित आर्य (Rohit Arya) याच्या छातीत गोळी मारुन त्याला ठार केले, असा खळबळजनक आरोप अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुते (Nitin Satpute) यांनी केला. रोहित आर्य याला गोळी मारुन ठार मारण्याऐवजी दुसरा काही उपाय नव्हता का, असा सवाल अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुते विचारला. (Mumbai crime news)

रेस्क्यू ऑपरेशन सुरु असताना डीसीपी दत्ता नलावडे हे रोहित आर्य  याच्याशी बोलत होते. पोलिसांना रोहित आर्य याची पार्श्वभूमी माहिती झाल्यानंतर त्यांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क का साधला नाही? ते केसरकरांच्या संपर्कात होता तर पोलिसांनी रोहित आर्य याला दीपक केसरकर यांच्याशी का बोलून दिले नाही? मुंबई पोलिसांनी टोकाचं पाऊल का उचललं? रोहित आर्य याने मुलांना ओलीस ठेवले. पण त्यासाठीची परिस्थिती सरकारने निर्माण केली. हा प्रसंग टाळता आला असता. रोहित आर्य याने त्याच्या सरकारी कामाचे पैसे मिळवण्यासाठी उपोषण केले. मात्र, सरकारने त्याला पैसे दिले नाहीत. रोहित आर्य हा दहशतवादी नव्हता, सरकारचीच कामं करत होता मग तुम्ही त्याला वाचवले का नाही, असा सवाल अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुते यांनी उपस्थित केला.

Mumbai Crime: रोहित आर्यकडे छऱ्याची गन होती तरीही पोलिसांना फायरिंग का केली?

रोहित आर्य याच्याकडे पिस्तुल होते की नाही, याबाबत पोलिसांकडून कोणतेही अधिकृत पत्रक आलेले नाही. डीसीपी दत्ता नलावडे यांनी गुरुवारी रोहित आर्य याच्याकडे गन होती की नाही, याचा तपास करु, असे म्हटले. त्याच्याकडे गन असली तरी छऱ्याच्या बंदुकीने कोणाची हत्या होऊ शकत नाही. पोलिसांना रोहित आर्य याच्या हातावर किंवा पायावर गोळी मारता आली असती. मुलांच्या सुरक्षेसाठी ते गरजेचे होते. पोलिसांना अशाप्रकारची परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण दिलेले असते. पोलिसांना गोळी मारायचीच होती तर ती पायावर मारायला पाहिजे होती. पोलीस म्हणतात, आम्ही पायावरच गोळी मारली होती, पण पायातून काहीतरी काढायला खाली वाकला अन् गोळी छातीत घुसली. पोलिसांचे हे स्पष्टीकरण खोटे आहे, हे लहान शेंबडा मुलगाही सांगेल. अमोल वाघमारे या पोलिसाला हिरो व्हायचं होतं आणि त्यामुळे त्याने हे एन्काऊंटर केले. पोलिसांनी मुलांना सोडवली ही कौतुकाची बाब आहे. पण ज्याला एन्काऊंटरमध्ये मारले तो सराईत गुन्हेगार नव्हता. रोहित आर्यचा बनावट एन्काऊंटरमध्ये खून करण्यात आला. या सगळ्या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे आणि त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका मी दाखल करणार असल्याचे अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुते यांनी सांगितले.

आणखी वाचा

एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारतानाचे फोटो, रोहित आर्य ज्या योजनेमुळे आयुष्यातून उठला ती महत्त्वाकांक्षी सरकारी योजना नेमकी काय होती?

आणखी वाचा

Comments are closed.