रोहित पवार, अमोल मिटकरींची पोलिसांसोबत बाचाबाची, विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक
मुंबई: मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे आक्रमक झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा अपघाती निधन झालं, याबाबत पुरावे असताना पोलीस कारवाई का करत नाहीत, असा सवाल त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन उपस्थित केला. यावेळी पोलीस ठाण्यामध्ये बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार आणि अमोल मिटकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले. इतके पुरावे आहेत सगळे न्यूजमध्ये सगळं आलेलं आहे, कारवाई का केली जात नाही, पोलीस ठाण्यामध्ये हे नेते आक्रमक झाल्याचे दिसून आले.
डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी यांच्यावरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार, अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर आक्रमक झालेले आहेत, डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी यांच्यावरोधात तात्काळ तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी या नेत्यांची आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती निधन झालं आहे. त्यामुळे फक्त कारवाई करू अशी आश्वासन नको आहेत. तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील या नेत्यांनी केली आहे.
पोलिसांच्या केबिनमध्ये फक्त अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर, रोहित पवारांसह त्यांचे वकील उपस्थित
डीजीसीएच्या अहवालामध्ये देखील व्हिएसआर कंपनीची चूक होती ती समोर आली आहे, कंपनीचा निष्काळजीपणा देखील समोर आला आहे. या दोघांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा प्रामुख्याने दाखल करावा आणि यामध्ये दोघांचाही समावेश आहे, अपघात झाला त्यावेळी डीजीसीएकडून हा अपघात असल्याचं म्हटलं होतं, मात्र दुसरीकडे व्हिएसआर कंपनीचा जो निष्काळजीपणा होता, मेंटेनन्स ठेवलेला नव्हता हे समोर आल्यानंतर या दोन्ही संस्थाच्या संबंधित अधिकाकाऱ्यांवरती देखील गुन्हा दाखल कराला या मागणीसाठी रोहित पवार आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी पोलिस देखील आहे, एकूण वातावरण तापल्यां दिसून येत आहे. कार्यकर्त्यांना पोलिस केबिनच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे, पोलिसांच्या केबिनमध्ये फक्त अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर, रोहित पवारांसह त्यांचे वकील उपस्थित आहे.त्यांच्याशी प्रवीण मुंडे चर्चा करताना दिसत आहेत, कायदेशीर कारवाई होईल आणि ती कायद्याच्या चौकटीत केली जाईल असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे, मात्र रोहित पवार अमोल मिटकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.
रोहित पवार यावेळी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले, यावेळी त्यांचा पोलिसांनी शाब्दिक वाद झाला. पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढेही पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. योग्य ती कारवाई करू, कायद्याच्या चौकटीतून ती कारवाई होईल असं त्यांनी यावेळी आमदारांना आणि नेत्यांना सांगितलं मात्र, तक्रारअर्ज करून भागणार नाही गुन्हा दाखल करावा यावरून आमदार आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
पुरावे असताना कारवाई का नाही? रोहित पवारांचा संतप्त सवाल
रोहित पवार यांनी पोलिस ठाण्यात आक्रमक पवित्रा घेत पोलिसांना धारेवर धरत विचारले की, “राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघातात मृत्यू होतो, आमच्याकडे या प्रकरणात घातपाताचे स्पष्ट पुरावे आहेत, तरीही पोलीस अद्याप एफआयआर (FIR) का दाखल करत नाहीत?” विमान कंपनीला वाचवण्यासाठी पोलीस दबावखाली काम करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
तर आमदार अमोल मिटकरी यांनीही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एवढ्या मोठ्या नेत्याचा जीव जातो आणि पोलीस केवळ चौकशीचे नाव सांगून वेळकाढूपणा करत आहेत,” असे मिटकरी म्हणाले. आंदोलनाची तीव्रता पाहता पोलीस उपायुक्त (DCP) प्रवीण मुंढे तातडीने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी रोहित पवार आणि उपायुक्त मुंढे यांच्यात जोरदार वादावादी झाली. डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी यांच्यावरोधात तात्काळ तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली.
आणखी वाचा
Comments are closed.