नाहीतर मग माझ्यावरती कारवाई करा; रोहित पवारांचा संताप, बारामती पोलिस स्टेशनमध्ये मांडले मोठे मु

बारामती: बारामतीत शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची आणि बारामती पोलिस स्टेशनमध्ये (Baramati Police Station) पोलिसांसोबत वादावादी झाल्याची माहिती आहे. काल (बुधवारी, ता २५) मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात देखील रोहित पवारांची (Rohit Pawar) पोलिसांसोबत बाचाबाची झाली होती, तर आज देखील बारामती पोलिस रोहित पवारांची तक्रार घेतील पण त्यांनी गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिस रोहित पवारांची एफआयआर दाखल करून घेत नसल्याने रोहित पवार आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. तर आमची केस खोटी आहे आमचा एफआयआर खोटा आहे असं सांगा मग, आम्हाला एफआयआर तरी द्या नाहीतर मी खोटं एफ आय आर करतोय म्हणून माझ्यावरती कारवाई करून टाका, असंही त्यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार, युगेंद्र पवार यांच्यासह काही स्थानिक नेते, आणि वकिल हे पोलिसांना काही गोष्टी व्यवस्थित पटवून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र पोलिस तक्रार दाखल करून घेत आहेत, मात्र एफआयआर दाखल करून घेत नसल्याचं समोर येत आहे. पोलिस रोहित पवारांची तक्रार घेतील पण त्यांनी गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मी खोटं एफआयआर करतोय म्हणून माझ्यावरती कारवाई करून टाका

रोहित पवार पोलिसांना सर्व गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र पोलिस तक्रारीवरती ठाम असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी रोहित पवारांनी पोलिसांशी बोलताना म्हटलं की, आमची केस खोटी आहे, आमचा एफआयआर खोटा आहे असं सांगा मग, आम्हाला एफआयआर तरी द्या नाहीतर मी खोटं एफआयआर करतोय म्हणून माझ्यावरती कारवाई करून टाका. एक महिना झालं एक तरी स्टेटमेंट आलं आहे का सीआयडी कडून, सीआयडीने कोणाला बोलावलं का नाही, त्याचा मालक रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत बसला, सीआयडीने त्याला आणखी बोलावलं नाही, व्ही के सिंग जो मालक आहे, त्यालाही अद्याप पर्यंत बोलावलेलं नाही, त्या विमानाचा मेंटेनन्स करणारा जो त्यांचा माणूस आहे महाराष्ट्रातला त्यालाही अद्याप पर्यंत बोलावलेलं नाही, आतापर्यंत त्यांनी सीसीटीव्ही इथलेच गोळा केले आहेत, विमानात जे पायलट येणार होते ते अचानक कॅन्सल झाले, का कॅन्सल झाले? त्यांना आतापर्यंत बोलावलेलं नाही, मग नेमकं चाललं काय आहे, डीजीसीएच्या कोणत्या अधिकाऱ्याने या सगळ्याला मंजुरी दिली आहे, असंही यावेळी त्यांनी पोलिसांशी बोलताना सांगितलं आहे.

दादांना न्याय द्यायला आम्ही दहा वर्ष थांबू का?

पुढे रोहित पवार म्हणाले, आम्ही जी माहिती दिली प्रेझेंटेशन केले त्यातील माहिती ती आमच्या लेवलला कळलेली माहिती आहे, पब्लिकला तर काहीच माहिती नाही, मी प्रेझेंटेशन केलं, चुका केले असतील, मला काउंटर तरी कोणी केला आहे का? केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री (Civil Aviation Minister) जिथे नसले पाहिजेत असं मी म्हणत असलो तरी मी त्यांच्या मंत्रालयाला देखील माहिती पाठवलेली आहे, व्हीएसआर कंपनीचे आणि डीजीसीए चे आणि केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्रीची पार्टी आहे त्या पार्टीचे आणि त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे, म्हणून हे व्हीएसआरला वाचवत आहेत, ते सर्वजण व्हीएसआरला वाचवत आहेत, त्यामुळे आमचं मत आहे की, तुम्ही देखील त्या व्हीएसआरच्या विरोधात एफआयआर घेत नाही म्हणजे तुम्ही देखील त्यांना वाचवत आहात, त्याचबरोबर तुम्ही जे सांगत आहात त्यामध्ये दोनच गोष्टी आहेत एक टेक्निकल आणि दुसरा आहे अपघात, क्रिमिनल चौकशी कोण करत आहे, पाच लोकांच्या मृत्यूची एफआयआर तुम्ही घ्यावी एवढीच आमची मागणी आहे, बाकी आमचं काही म्हणणं नाही, अपघाताची  एफआयआर दाखल करा, त्यानंतर प्रकरण सीआयडी कडे वर्ग करा, त्यांनी आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही, सीबीआयमध्ये आत्ता आपण बोलतोय पण 7000 पेक्षा जास्त केस प्रलंबित आहेत, 2600 केस दहा वर्ष झालं प्रलंबित आहेत, दादांना न्याय द्यायला आम्ही दहा वर्ष थांबू का? असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.