‘ज्यांना लंगोट घालण्याचं माहीत नाही,…’; अजित पवारांच्या आमदाराकडून रोहित पवारांची खिल्ली

अहिलीनगर: यंदाची 67 वी महाराष्ट्र केसरी कुश्ती (कुश्ती) स्पर्धा मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाली. पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला. मात्र, अंतिम सामन्यात पंचांकडून चुकीचा निर्णय झाल्याचे सांगत चांगलाच वाद झाल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. उपविजेता पैलवान शिवराज राक्षेनं चक्क पंचाला लाथ मारल्याने चांगलाच गोंधळ उडाला. त्यानंतर, या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर राजकीय वर्तुळातूनही टीका होऊ लागली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला राजकीय रंग मिळाल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यातच, आमदार रोहित पवार यांनी नव्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचं आयोजन कराव, ही स्पर्धा शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावी, असेही म्हटले होते. तसेच, अहिल्यानगर येथील कुस्ती स्पर्धेत पैलवानांचा मान-सन्मान राखण्यात आला नसल्याचाही आरोप त्यांनी केला होता. आता, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (NCP) आमदार संग्राम जगताप यांनी रोहित पवारांवर पलटवार केला आहे.

तुम्ही अजित दादांशी निगडित आहात म्हणून आम्ही थोडा मान-सन्मान राखतो, पण याचा कोणी गैरफायदा कुणी घेऊ नये. ज्यांना कधी लंगोट घालण्याचं माहिती नाही, त्यांनी कुस्तीवर बोलू नये असं म्हणत अहिल्यानगरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली. अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते. महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही पैलवानासाठी होती की राजकीय नेत्यांसाठी होती, असा सवाल उपस्थित करत स्पर्धेदरम्यान पैलवानांचा योग्य मानसन्मान झाला नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. रोहित पवारांच्या या टीकेला टीकेला आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

आत्तापर्यंतच्या कुस्ती स्पर्धेत कोणी हभप महाराज नव्हते, किंवा कोणी क्रिकेटमधील व्यक्ती नव्हात. सर्व राजकीय माणसांनीच ही कुस्ती स्पर्धा पुढे नेली. अलिकडच्या काळात नव्याने राजकारण येणाऱ्यांना मी लगेचच महाराष्ट्रात पुढे गेलं पाहिजे, म्हणून ते काहीही बोलतात. पण, थोडा वेळ लागेल, गडबड न करता सगळं करावं. आम्ही अजित दादांमुळे पडद्याआड घालतो, त्यांचा मान-सन्मान राखला जातो, असेही संग्राम जगताप यांनी म्हटलं.

काय म्हणाले होते रोहित पवार

अहिल्यानगर मधील महाराष्ट्र केसरी कुस्तीचे आयोजन हे पैलवानांसाठी होते की नेत्यांसाठी हेच कळत नव्हते तिथे पैलवान कमी आणि पंच कमी आणि नेतेच जास्त होते. ती कुस्ती कुठल्यातरी पैलवानाला जिंकवण्यासाठी घेतली होती का काय हे कळत नव्हते. जो निकाल लागला यामध्ये सुद्धा पैलवानावर अन्याय झाला, हे सगळं योग्य नाही. त्यामुळे महाराष्ट्र केसरी पुन्हा एकदा परिषदेच्या माध्यमातून शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली कर्जत जामखेडमध्ये घ्यावी अशी मी विनंती केली आहे. कुठल्याही पैलवानाला जिंकवण्यासाठी आम्ही ही स्पर्धा घेणार नाही. जर ही गोष्ट मान्य केली तर खरी महाराष्ट्र केसरी मार्च अखेर आपल्याला बघायला मिळेल, असं रोहित पवारांना म्हटलं आहे.

हेही वाचा

करुणा शर्मांना 2 लाख पोटगी, कोर्टाच्या निर्णयावर धनंजय मुंडेंकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘लिव्ह इन रिलेशनशीप’

अधिक पाहा..

Comments are closed.