अजितदादांच्या विमानाचा स्फोट झाला पण कागद का जळला नाही?; रोहित पवारांनी सांगितलं कारण, म्हणाले.
अजित पवार विमान अपघातावर रोहित पवार : विमानातील ब्लॅकबॉक्स जळाला, असं सांगण्यात येत आहे. खरं सांगायचं झालं तर 1100 डिग्री सेल्सिअस असताना, तिथे 1 तास ब्लॅक बॉक्स पडला असेल तरच तो थोडा डॅमेज होतो, असं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे. सहा हजार मीटर खोलीपर्यंत पाण्याचं जे प्रेशर असतं त्या प्रेशरवर ब्लॅक बॉक्स ठेवण्यात येतो. हे अतिरिक्त प्रेशर सांगितलं गेलंय. कितीतरी हत्ती त्यावर उभे केलेत तरी ते टिकू शकेल, इतका दबाव त्यात असतो. आगीच्या बाबतीत बोलायचं झालं तर WHO ब्लास्ट झाला त्याबद्दल सांगायचं झालं तर, तिथं अनेक कागद न जळालेले आढळून आले. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला की हे कागद का जळाले नाहीत? मात्र हा स्फोट आणि त्याचा भपका का हा काही सेकंदाचा असतो. काही सेकंदात तो विझुनही जातो, त्यामुळे काही कागद तिथे जळालेले नाहीत. असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: कागदे जळाले नाहीत तोच नियम ब्लॅक बॉक्सलाही लागू
विमानाचा मेल्टिंग पॉईंट हा 635 अंश डिग्री सेल्सियस आहे. विमानाची ॲल्युमिनियम बॉडी ही 650 डिग्री सेल्सियसला वितळू शकतो. नंतरचा विमानाचा आतला भाग थर्मल इन्सुलेशनचा आहे. म्हणजे विमानाची बॉडी ज्या ॲल्युमिनियमपासून बनली आहे, त्याच्या आत हा भाग असतो आणि त्याच्या आतमध्ये हा ब्लॅक बॉक्स असतो. त्यामुळे वारंवार जो दावा करण्यात येत आहेत ते सर्व मॅन्युफिलेशन करण्यात येत आहे. अकराशे अंशांनी एक तास जळाला तरच ब्लॅक बॉक्स निकामी होतो. कागदे जळाले नाहीत, तोच नियम ब्लॅक बॉक्सलाही लागू होतो, असेही रोहित पवार म्हणाले.
Rohit Pawar : ब्लॅक बॉक्स जळला हे केवळ मॅन्यूप्युलेट करण्यासाठीच
रोहित पवार यांनी आज (बुधवारी) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काही खळबळपालक दोष केले आहेत. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबाबत अनेक नव्या शंका उपस्थित केल्या. यावेळी त्यांनी विमानाचा पायलट सुमित कपूर आणि व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोपही केले. अजितदादांच्या अपघाताचा आणखी एक व्हिडीओ समोर आला. यामध्ये अपघातानंतर मोठे स्फोट झाल्याचं या व्हिडीओमधून दिसून येतंय. विमान पडल्यानंतर काही वेळाच्या अंतराने स्फोट झाले होते. त्या विमानात अधिकचे इंधन होते. विमानाच्या पंखामध्ये आणि आतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यात आले होते, यामुळे अपघातानंतर वारंवार स्फोट झाले. त्यामुळे ब्लॅक बॉक्स जळला हा जो प्रचार सुरू होता, जे सांगण्यात येतंय ते केवळ मॅन्यूप्युलेट करण्यासाठी आहे असा आरोप रोहित पवारांनी केला. असेही रोहित पवार म्हणाले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.