अजितदादांच्या विमान अपघातापूर्वी कॅप्टन शांभवी पाठक ‘ओह शीट… ओह शीट’ का बोलल्या? रोहित पवारां
अजित पवार विमान अपघातावर रोहित पवार : अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये मुख्य वैमानिक सुमित कपूर यांची भूमिका संशयास्पद असल्याचे मत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केले. या विमान अपघाताच्या काही क्षण आधी सहवैमानिक असलेल्या कॅप्टन शांभवी पाठक यांच्या संवादाची एक क्लिप समोर आली होती. यामध्ये त्या , ‘ओह शीट… ओह शीट’ बोलताना ऐकू येत आहे. त्यांना आता आपले विमान कोसळणार (Plane Crash) याचा अंदाज आल्यामुळेच त्या तसे बोलल्या असाव्यात, असे वक्तव्य रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले. रोहित पवार यांनी बुधवारी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सविस्तर प्रेझेंटेशन देताना काही शंका उपस्थित केल्या.
अजित पवार यांचे विमान ज्या गावात कोसळले तिथून नेहमी विमानं जातात. लोकांना विमानांचा आवाज परिचित आहे. गावातील लोकांचं म्हणणं आहे, अजित पवार यांच्या विमानातून वेगळा आवाज येत होता. त्यांचे विमानही खूप खाली होते. या सगळ्या परिस्थितीचा अंदाज कॅप्टन शांभवी पाठक यांना आला असावा. कदाचित कोणीतरी विमानातील सर्किट ब्रेकरच्या माध्यमातून विमान खाली आणले असावे. विमान खूप खाली आल्यानंतर स्टॉल वॉर्निंग सिस्टीम सुरु होते. पण स्टॉल वॉर्निंग सिस्टीम बंद असावी. मात्र, विमान खूप खाली आल्यानंतर आता ते कोसळणार, याचा अंदाज कॅप्टन शांभवी पाठक यांना आला असेल. जो माणूस जीवाची पर्वा करतो, तशीच प्रतिक्रिया कॅप्टन शांभवी पाठक यांच्याकडून आली. त्यामुळे त्या शेवटच्या काही क्षणांमध्ये ‘ओह शीट… ओह शीट’ बोलताना ऐकू येत आहे. यानंतर 9 ते 10 सेकंदात विमान खाली कोसळले. आमचा कॅप्टन शांभवी पाठक यांच्यावर कोणताही आक्षेप नाही. आमचा आक्षेप मुख्य वैमानिक सुमित कपूर यांच्यावर आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
अजित पवार यांचे विमान जे पायलट चालवणार होते, ते ट्रॅफिकमध्ये अडकल्याने सुमित कपूर यांना आयत्यावेळी वैमानिक म्हणून पाठवण्यात आले. पण मुंबईत सकाळी साडेसहा वाजता ट्रॅफिक कुठे असते? कॅप्टन मदन यांच्या पत्नीने ट्विट केले आहे की, माझ्या पतीला काहीही झाले नाही, तुम्ही आम्हाला सांत्वनाचे मेसेज पाठवू नका. लोकांना वाटलं होतं, कॅप्टन मदन अजित पवार यांचे विमान चालवत आहेत. सुमित कपूर यांच्याविषयी कोणालाही माहिती नव्हते. त्यामुळे खरोखरच कॅप्टन मदन आणि त्यांचा क्रू ट्रॅफिकमध्ये अडकला होता का, यासाठी सीसीटीव्ही तपासले हवेत. या चौकशीचा वेग अत्यंत मंद आहे. कॅप्टन सुमीत कपूर यांना 2010 आणि 2017 साली दारु पिऊन विमान चालवल्याप्रकरणी परवाना रद्द करण्यात आला होता. ते विमान अपघाताच्या आदल्या दिवशी हाँगकाँगवरुन आल्याचे सांगितले जाते. काही महिन्यांपूर्वी भाजपचा एक नेता विमानाने नांदेडला जात होता. त्यावेळी कपूर वैमानिक होते. तिकडेही ज्याप्रकारे लँडिग झाले होते, त्याची तक्रार संबंधित नेत्याने केली होती. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.