‘शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची महाराष्ट्र वाट पाहतोय’
मॅनक्राव कोकेटे वर रोहित पवार: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे ( Manikrao Kokate ) यांच्यावर टीका केलीय. लातूर येथे मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेतला असला तरी ज्या पत्त्यांच्या खेळामुळे हा गोंधळ झाला आहे, तो खेळ खेळणाऱ्या मंत्र्यांवर आधी कारवाई होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची महाराष्ट्र वाट पाहत आहे. राज्यकर्ते लोकभावनेचा आदर राखतील, ही अपेक्षा असं ट्वीट करत रोहित पवार यांनी कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. यावर बोलताना माणिकराव कोकाटे यांनी मी युट्युब बघत असताना रमी गेमची आलेली जाहिरात स्किप करत होतो, असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी माणिकराव कोकाटे यांचे मोबाईलवर रमी गेम खेळतानाचे आणखी दोन व्हिडीओ समोर आणले आहेत. यामुळे माणिकराव कोकाटे यांचा पाय आणखी खोलात गेल्याचे दिसून येत आहे.
माणिकराव कोकाटे हे जाहिरात स्किप करत नव्हते तर ते जंगली रमीच खेळत होते : आव्हाड
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जाहिरात स्किप करत नव्हते तर ते जंगली रमीच खेळत होते, असा ठाम दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर दोन व्हिडिओ पोस्ट केले आहेत आणि यामध्ये कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल, असा दावा आव्हाड यांनी केला आहे. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो, असे आव्हान देखील आव्हाड यांनी दिले आहे.
पक्ष त्यांच्यासंदर्भात योग्य निर्णय घेईल, सुनील तटकरेंचं सूचक वक्तव्य
शेतकऱ्यांविषयी एकापाठोपाठ एक वादग्रस्त वक्तव्य आणि नुकत्याच झालेल्या अधिवेशनावेळी सभागृहात रमी खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे वादात सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांचे कृषीमंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या वर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्ष त्यांच्यासंदर्भात योग्य निर्णय घेईल, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या:
Manikrao Kokate and Sunil Tatkare: माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रिपद धोक्यात, तटकरे म्हणाले, ‘त्यांच्याकडून अयोग्य घडलं, पक्ष योग्य निर्णय घेईल!’
आणखी वाचा
Comments are closed.