आगामी काळात संग्राम जगताप भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतील, रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले, भाजपन


संगग्राम जगटॅपवरील रोहित पवार: दीपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. आपल्या दीपावली खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा. सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूंवर होणारे हल्ले हे मशिदीमधून घडत आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. यानंतर जगतापांच्या (Sangram Jagtap) वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षाच्या नोटिशीनंतरही संग्राम जगताप यांचे मुस्लिम विरोधात वक्तव्यं सुरूच आहेत. अहिल्यानगरमधील सभेत बोलताना संग्राम जगताप यांनी आता आपल्याला हा देश, धर्म सुरक्षित ठेवायचा आहे, त्यामुळे आपले पण दोन-चार लोक आत गेले तरी हरकत नाही, पण लोकांना आता प्रत्युत्तर द्या, असे वक्तव्य केले. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठा दावा केलाय.

Rohit Pawar on Sangram Jagtap: रोहित पवारांचा मोठा दावा

रोहित पवार म्हणाले की, संग्राम जगताप 2029 साली राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवतील असे वाटत नाही. आगामी काळात ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतील. संग्राम जगताप पक्षाच्या प्रमुखांचे देखील ऐकत नाहीत. त्यामुळे संग्राम जगताप यांनी आपला नेता बदलला आहे, असे सध्या दिसत आहे. भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. अजूनही हे ऑपरेशन संपलेले नाही. या ऑपरेशनचे सत्र दोन सुरू झाले आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते फोडले जात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. आता रोहित पवार यांच्या दाव्यावर संग्राम जगताप काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ajit Pawar on Sangram Jagtap: अजित पवारांकडून संग्राम जगतापांना नोटीस

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी केलेलं वक्तव्य हे पक्षाच्या विचारधारेला धरुन नाही. याबद्दल आम्हाला नोटीस काढावी लागेल, असं मी सांगितलं होतं. त्या पद्धतीने नोटीस काढली आहे. शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सदस्य असाल, सभासद असाल तर त्या पक्षाच्या विचारधारेबद्दल काहीही बोलायला लागला तर कोणताही पक्ष सहन करणार नाही. नोटीस काढल्यावर त्याला प्रक्रिया असते. त्या नोटीसला काय उत्तर येते ते उत्तर आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असे अजित पवार म्हणाले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=afw_qpvfx9q

आणखी वाचा

Sangram Jagtap: मुस्लिमबहुल भागांमध्ये कमी मतं पडली अन् संग्राम जगतापांच्या राजकारणाचा पॅटर्न 180 अंशात बदलला, वारकरी संप्रदाय ते कट्टर हिंदुत्त्वापर्यंतचा प्रवास कसा झाला?

आणखी वाचा

Comments are closed.