रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर निशाणा, म्हणाले, जय पवारांवर दबाव; राहुल गांधींचीही प्रतिक्रिया
नवी दिल्ली: बारामती विमान दुर्घटनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी घेत असून आज काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही त्यांनी भेट घेतली. या भेटीत बारामती विमान (Baramati) दुर्घटना, त्याचा तपास आणि पोलीस प्रशासन, आणि सरकारची भूमिका यावर त्यांनी चर्चा केली. तसेच, याप्रकरणी, डीजीसीएला कलम 12 अंतर्गत समिती स्थापन करता येते, ती समिती राहुल गांधींच्या (Rahul gandhi) नेतृत्त्वात असावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर, राहुल गांधी यांनीही याप्रकरणी निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाची मागणी केलीय.
अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीबीआयकडे अजूनही महाराष्ट्रातून प्रस्ताव पाठवलेला नाही. अजित दादांच्या पक्षाच्या प्रमुखांनी विनंती केली, काल-परवा एक स्मरणपत्रही मुख्यमंत्र्यांना देण्यात आलंय. म्हणजेच अजूनही सीबीआयकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. आम्हाला जी माहिती आहे, त्यानुसार राज्य सरकारने प्रस्ताव सीबीआयकडे दिलेला नाही. सुशांत सिंह प्रकरणात बिहारने प्रस्ताव दिला, लगेच दुसऱ्या दिवशी सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र, विमान दुर्घटनाप्रकरणी राज्याकडून सीबीआयकडे प्रस्ताव आलेला नाही, अशी आमची माहिती आहे, असे रोहित पवार यांनी राहुल गांधींच्या भेटीनंतर बोलताना म्हटले.
मी सीबीआय, DGCA आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे वेळ मागितली आहे, पण मी विरोधातील आमदार आहे, त्यामुळे कदाचित वेळ मिळत नसेल, असे रोहित पवार यांनी म्हटले. महाराष्ट्रात साधी FIR होत नाही, इथे DGCA भेटत नाही. DGCA आणि CBI हा केंद्राचा विषय आहे, असेही त्यांनी म्हटले.
प्रफुल पटेल लक्ष्य, जय पवारांवर दबाव
प्रफुल्ल पटेल स्वतः म्हणाले की, अजित पवारांकडे शेवटची जी फाईल होती ती फाईल माझी होती. जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नये असे सांगण्यात आलं आहे. कुणी सांगितलं हे स्पष्ट नाही, भाजपने सांगितलं की त्यांच्या पक्षाने माहिती नाही, असे म्हणत जय पवार यांच्यावरही दबाव असल्याचं रोहित पवारांनी सूचवलं आहे. व्ही. के. सिंगच्या मुलाच्या लग्नाला प्रफुल्ल पटेल होते, ते त्याची मदत करत आहेत का? सामान्य लोकांना हा विश्वासघात वाटतो. दादांबरोबर राहिलेला नेता लग्नाला उपस्थित होता, त्यांनीही विश्वासघात केला आहे. सिंगला वाचवलं नाही तर तो आपलं नाव सांगेल अशी भीती काही जणांना असू शकेल, असे म्हणत पुन्हा एकदा रोहित पवार यांनी प्रफुल पटेलांना लक्ष्य केलंय.
श्री रोहित पवार यांनी आज माझी भेट घेतली आणि श्री अजित पवार जी आणि इतरांचा जीव घेणाऱ्या बारामती विमान अपघाताच्या चौकशीबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारे पत्र सादर केले.
कायद्याची मूलभूत तत्त्वे पाळली गेली नाहीत असे दिसते आणि एफआयआर नोंदविला गेला नाही… pic.twitter.com/Hg3AIDFVLq
—राहुल गांधी (@RahulGandhi) १२ मार्च २०२६
राहुल गांधीचं ट्विट
आमदार रोहित पवार यांनी आज माझी भेट घेत बारामती विमान अपघात आणि अजित पवार यांच्या निधनाच्या चौकशीबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारे पत्र दिले. याप्रकरणात कायद्याच्या मूलभूत तत्त्वांचे पालन झालेले दिसत नाही. विशेष म्हणजे ही गंभीर घटना असतनाही अद्याप कुठलाही एफआयआर नोंदवण्यात आला नाही. या घटनेची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी ट्विटरवरुन रोहित पवार यांच्या भेटीचा फोटोही शेअर केला आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.