संजय गायकवाडांविरोधात पोलीस तक्रार घेईनात, आता रोहित पवार कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्य
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तब्बल 37 वर्षांपूर्वी लिहलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरुन प्रकाशक प्रशांत आंबी (Prashant Ambi) यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ (Shivaji Kon Hota) या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावरुन प्रशांत आंबी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. याविरोधात प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरच्या (Kolhapur News) राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी तुर्तास आमदार असलेल्या संजय गायकवाड यांच्यावर तातडीने गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. (Maharashtra Politics news) या प्रकरणात आता शिवाजी कोण होता? पुस्तकाच्या प्रकाशक धमकी प्रकरणात होणार आमदार रोहित पवार यांची एंन्ट्री झाली आहे.
आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रोहित पवार राजारामपुरी पोलीस स्टेशनला येणार आहेत. सायंकाळी पाच वाजता राजारामपुरी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाला देखील ते हजेरी लावणार आहेत.
Sanjay Gaikwad : तक्रार दाखल करायला गेलेल्या प्रकाशकाला पोलिसांनी काय सांगितलं?
प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरच्या (Kolhapur News) राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी तुर्तास आमदार असलेल्या संजय गायकवाड यांच्यावर तातडीने गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. (Maharashtra Politics news)
प्रशांत आंबी यांनी पोलिसांकडे संजय गायकवाड यांच्याविरोधात रितसर आणि सविस्तर तक्रार देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तेव्हा पोलिसांनी सांगितले की, आम्हाला आमच्या लीगल टीमशी बोलावं लागेल. मी पोलिसांनी तक्रार दिली असून त्यामध्ये कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करावा, तेदेखील नमूद केले आहे. पोलिसांनी मला तक्रार मिळाल्याची पोचपावती दिली असून गुन्हा दाखल होणार की नाही, याबाबत दोन दिवसांत माहिती देऊ असे सांगितल्याची माहिती प्रशांत आंबी यांनी दिली. प्रशांत आंबी यांनी तक्रार अर्जात संजय गायकवाड यांच्याविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करावा, हेदेखील नमूद केले आहे. संजय गायकवाड यांच्याविरोधात कलम 351 (3), कलम 352, कलम 356, कलम 192 व मानवी हक्क संरक्षण कायदा आणि इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी प्रशांत आंबी यांनी केली आहे.
Kolhapur News: पडद्यामागे राहून काम करण्याची माझी पद्धत – पोलीस अधीक्षक निलोत्पल
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार घेतला. पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारतात त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व विभागांची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला. जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकरणांची मी सध्या माहिती घेत आहे. पडद्यामागे राहून काम करण्याची माझी पद्धत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आपण चांगलं काम करू असा विश्वास देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केला. दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांच्याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीबाबत मला माहिती नाही. याबाबत सविस्तर माहिती घेऊन बोलेन. मात्र, या प्रकरणामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेऊ अशी प्रतिक्रिया देखील पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.