रोहित पवारांचा दावा फोल? निवडणूक आयोगातील पत्राबाबत अजित पवार गटातील बड्या नेत्याचा गौप्यस्फोट,
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांना आता अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. रोहित पवार (Rohit Pawar) केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा पक्षातील एका वरिष्ठ नेत्यानं केला आहे.
अजित दादांनीच दिले होते अधिकार!
रोहित पवार यांनी ज्या पत्राचा उल्लेख करून प्रफुल पटेल यांना अधिकार दिल्याचा आरोप केला, त्याबाबत सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. निवडणूक आयोग आणि न्यायालयातील कायदेशीर कामकाजासाठी राष्ट्रीय अध्यक्षांना (अजित पवार) प्रत्येक वेळी प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसायचे. त्यामुळे कामकाजात सुसूत्रता यावी, यासाठी अजित पवार यांनीच स्वतः राष्ट्रीय कार्याध्यक्षांना (प्रफुल पटेल) हे अधिकार दिले होते. (Rohit Pawar)
निवडणूक आयोगातील सुनावणी आणि कोर्टातील तारखांना राष्ट्रीय अध्यक्षांची सततची उपस्थिती अनिवार्य टाळण्यासाठी हे अधिकार देण्यात आले होते. अजित दादांकडे उपमुख्यमंत्रीपद आणि इतर जबाबदाऱ्या असल्याने, त्यांच्या वतीने प्रफुल पटेल हे कायदेशीर कामकाज पाहत होते. हे अधिकार दादांच्या निधनानंतर अचानक दिलेले नसून, ते आधीपासूनच प्रफुल पटेल यांच्याकडे होते, जेणेकरून तांत्रिक कामात खंड पडू नये.
रोहित पवारांवर पलटवार
अजित पवार स्वतः कोर्टात किंवा निवडणूक आयोगात जात नव्हते, त्यावेळी प्रफुल पटेल यांच्या माध्यमातूनच सर्व अधिकृत कामकाज पाहिले जात होते. त्यामुळे या पत्राचा चुकीचा अर्थ काढून पक्षात फूट पाडण्याचा किंवा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न रोहित पवार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
नेमकं काय म्हणाले होते रोहित पवार?
काही दिवसापूर्वी अजितदादा पक्षाची काही कागदपत्रे समोर आली. हा कागद १०. ०३. २०२५ चा आहे, यामध्ये सुनेत्राकाकी यांचं एक महत्वाचं वाक्य आहे. अजितदादा यांचा अपघात २८ जानेवारी २०२५ ते राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यत जो पत्र व्यवहार निवडणूक आयोगाला केला जाईल तो ग्राह्य धरू नये. २६ फेब्रुवारीला एक पत्र अजितदादा पक्षाचे निवडणूक आयोगाला देण्यात आले होते, त्यात सह्या प्रफुल पटेल तटकरे यांच्या आहेत, ज्यामध्ये लिहिलं होत कि, आमचा पक्षाचा कॉस्टिट्युशन बदलला आहे. जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल तर नेशनल वर्किंग प्रेसिडेंटकडे (कार्यकारी अध्यक्ष Working President) ताकद असेल असा या पत्रात म्हटलं गेलं होतं, सर्व निर्णय हे ते घेतील असा या पत्रात म्हटलंय. कोण होतं नेशनल वर्किंग प्रेसिडेंट? प्रफुल पटेल होते. यामध्ये सर्व अधिकार वर्किंग प्रेसिंडेन्ट यांच्याकडे असावे असा या पत्रात होतं. पण हे पत्र जेव्हा सुनेत्रा काकींना कळल्यावर सुनेत्रा काकींनी आयोगाला पत्र दिलं, राष्ट्रीय अध्यक्ष होपर्यत कोणताही पत्र विचारात घेऊ नये, असंही रोहित पवारांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
पुढे रोहित पवारांनी बोलताना म्हटलं की, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल, भाजपच्या काही नेत्यांनी जय पवार यांची पत्रकार परिषद दाबली. त्यांच्या दबावामुळे ही पत्रकार परिषद झाली नाही असं मला वाटत माझं जयशी बोलणं झालं नाही. व्हीएसआर (VSR) कंपनीला वाचविण्याचं काम सुरु आहे या कंपनीला अपघातानंतर सुद्धा ८० ते ९० कोटी रुपये दिले. राहुल गांधी यांची मी जेव्हा भेट घेतली तेव्हा त्यांनी सांगितले जिथे तुला न्याय मिळेल त्या राज्यात तुझी FIR कर त्यामुळे आम्ही कर्नाटकात गेलो आणि तिथे झिरो एफआयआर झाला, अशी माहिती देखील रोहित पवारांनी यावेळी बोलताना दिली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.