कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा, मोठी स्पर्धा आहे, संधी कधीही मिळेल..रोहितनं संजूला दिलेला सल्ला

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना मुंबईत होणार आहे. 5 मार्चला दोन्ही संघ आमने सामने येतील. भारतानं वेस्ट इंडिजवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. भारताच्या या विजयात संजू सॅमसनच्या नाबाद 97 धावांच्या खेळीचा महत्त्वाचा वाटा होता. आयसीसीनं रोहित शर्मा आणि संजू सॅमसनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात रोहित शर्मानं संजूला नाराज होऊ नकोस, संधी कधीही मिळू शकते, असा सल्ला दिलेला.

रोहित शर्माचा संजूला सल्ला

आयसीसीनं रोहित शर्मा आणि संजू सॅमसनचा जो व्हिडीओ शेअर केलाय तो 7 फेब्रुवारीचा म्हणजेच टी 20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्याच्या दिवशीचा आहे. अमेरिकेविरुद्ध संजू सॅमसनला संघात स्थान मिळालं नव्हतं, तर त्यापूर्वी न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत तो मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलेला होता.  भारत आणि अमेरिका सामना सुरु होण्यापूर्वी रोहित शर्मा आणि संजू सॅमसन या दोघांची भेट झाली होती, त्यावेळी रोहित शर्मानं स्पर्धा मोठी असून कधीही तुला संधी मिळेल, तयार राहा, असं सांगितलं होतं, तो व्हिडीओ आयसीसीनं शेअर केला आहे.

संजू सॅमसन 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये संघाचा सदस्य होता, मात्र  त्याला संघात स्थान मिळालं नव्हतं. 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपसाठी जेव्हा संघ निवडण्यात आला तेव्हा संजू सॅमसन मुख्य विकेटकीपर आणि सलामीवर होता. मात्र, न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत 5 सामन्यात संजू अपयशी ठरला आणि यामुळं संघात बदल करण्यात आले. सलामीवीर म्हणून अभिषेक शर्मा आणि ईशान किशनला संधी देण्यात आली. यामुळं संजू सॅमसनला संघाबाहेर बसावं लागलं होतं. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मानं संजू सॅमसनला नाराज होऊ नको, स्पर्धा मोठी आहे, कधीही संधी मिळू शकते, असा सल्ला दिला होता.

आयसीसीनं रोहित शर्मा आणि संजू सॅमसनचा शेअर केलेला व्हिडीओ 7  फेब्रुवारी रोजी शूट करण्यात आला होता. 1  मार्चला संजू सॅमसन यानं नाबाद 97 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला, यामुळं संघानं उपांत्य फेरीत धडक मारली. संजू सॅमसनला नामिबियाविरुद्ध संधी मिळाली होती, त्या मॅचमध्ये संजूनं 22 धावा केल्या होत्या. यानंतर झिम्बाब्वे विरुद्ध पुन्हा एकदा संजू सॅमसनला संधी मिळाली होती, त्यात त्यानं 15 बॉलमध्ये 24  धावा केल्या होत्या.

रोहित शर्मा त्यावेळी संजूला म्हणाला होता की, कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा, यावर संजू सॅमसन नाही भावा मी ठीक आहे, असं म्हटलेलं. यानंतर ही मोठी स्पर्धा आहे, संधी केव्हाही मिळू शकते, असं रोहित शर्मानं म्हटलं. संजू सॅमसननं वेस्ट इंडिज विरुद्ध नाबाद  97 धावा करत संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला.

आयसीसीनं शेअर केलेला व्हिडीओ:

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.