गौतम गंभीरने कर्णधारपद काढून घेतलं, रोहित शर्माने सर्वांदेखत अनुल्लेखाने मारलं, मुंबईतील सोहळ्य

द्रुत वाचन दर्शवा

एआय द्वारे व्युत्पन्न केलेले मुख्य मुद्दे, न्यूजरूमद्वारे सत्यापित

रोहित शर्मा आणि गौतम गार्बीर: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयकडून नुकताच भारतीय संघ जाहीर करण्यात आला. यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली या दोघांना स्थान देण्यात आले असले तरी एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन (Team India ODI Captain) रोहितची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. त्याच्याऐवजी गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने शुभमन गिल याच्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगला खेळत असूनही गौतमी गंभीरने त्याला कर्णधारपदावरुन दूर केल्यावरुन बरीच टीका झाली होती. मात्र, बीसीसीआय आणि संघ प्रशासनाकडून 2027 साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघबांधणी करण्यासाठी शुभमन गिल याच्याकडे आतापासूनच कर्णधारपद देणे कसे गरजेचे होते, असे सांगून गौतमी गंभीरची तळी उचलण्यात आली होती.

या सगळ्यामुळे गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यातील सुप्त संघर्ष आणखी पेटू शकतो, असे म्हटले जात आहे. याचा प्रत्यय मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या सीएट क्रिकेट रेटिंग अॅवॉर्ड सोहळ्यात दिसून आला. यावेळी रोहित शर्मा याने ट्वेन्टी -20 विश्वचषक स्पर्धा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद जिंकण्याचे श्रेय प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिले. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवेळी गौतम गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक होता. परंतु, रोहित शर्मा याने गौतम गंभीरला अनुल्लेखाने मारत विजयाचे सर्व श्रेय द्रविडच्या पदरात टाकले. यामुळे आता रोहित शर्मा आणि गौतमी गंभीर यांच्यातील अंतर्गत संघर्ष आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळताना भारतीय संघाने आठ महिन्यांत दोन मोठ्या स्पर्धांचे विजेतेपद जिंकले होते. याबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ‘मला या संघासोबत खेळणे आवडते. ही संघबांधणीची प्रक्रिया बराच काळ सुरु होती. हे काही फक्त एक-दोन वर्षाचे काम नव्हते. आम्ही बराच काळ यावर काम करत होतो. आम्ही अनेकदा जेतेपद जिंकण्याच्या जवळ जात होतो पण विजय मिळत नव्हता. तेव्हा आम्ही सगळ्यांनी ठरवले की, काहीतरी वेगळे करायला पाहिजे. हे फक्त संघातील एक-दोन खेळाडूंचे काम नव्हते. सगळ्यांनी हा विचार मनात रुजवला पाहिजे, हा आमचा प्रयत्न होता. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही भारतीय संघातील सर्व खेळाडू स्वत:चा स्तर वाढवण्यासोबतच सामना कसा जिंकता येईल, या विचाराने प्रेरित होते. आम्ही 2024 साली जेव्हा ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करत होतो तेव्हा राहुल द्रविड आणि मला या प्रक्रियेमुळे खूप फायदा झाला. आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही ती प्रक्रिया सुरु ठेवली, असे रोहित शर्मा याने सांगितले.

आणखी वाचा

वाढलेलं पोट एकदम सपाट, इरेला पेटलेल्या रोहित शर्माचं ट्रान्सर्फोमेशन पाहून गौतम गंभीरही तोंडात बोटं घालेल

आणखी वाचा

Comments are closed.