IND vs WI: रोहित शर्माचा 'ओपनिंग' धमाका! 10000 धावा पूर्ण अन् सचिन तेंडुलकरचा विक्रम उद्ध्वस्त

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मालिकेतील शेवटचा आणि तिसरा एकदिवसीय सामना शनिवारी (३ ऑक्टोबर) खेळला गेला. चंदीगडमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचा अनुभवी स्टार सलामीवीर रोहित शर्माने एक उल्लेखनीय टप्पा पार केला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून १०,००० धावा पूर्ण केल्या.

रोहितने २०२ डावांमध्ये ही ऐतिहासिक कामगिरी केली. त्याचबरोबर त्याने भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.सचिनने सलामीवीर म्हणून एकदिवसीयमध्ये २१४ डावांमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल (२६८ डाव) आणि श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या (३०३ डाव) यांचा क्रमांक लागतो.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ चार खेळाडूंनीच दहा हजार धावा किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे.

या सामन्यात ३९ वर्षीय रोहितने भारताच्या पहिल्या दोन विकेट्स लवकर पडल्या असता संयमी खेळी केली. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणारे
१५३१० – सचिन तेंडुलकर (भारत)
१२७४० – सनथ जयसूर्या (श्रीलंका)
१०१७९ – ख्रिस गेल (वेस्ट इंडिज)
10000 – रोहित शर्मा (भारत)*
९२०० – ऍडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया)
९१४६ – सौरव गांगुली (भारत)
8648 – डेसमंड हेन्स (विंडीज)

रोहितचे पदार्पण आणि तो सलामीला कधी आला?
रोहितने सप्टेंबर २००७ मध्ये भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर खूप मोठ्या कालावधीनंतर त्याला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली.त्याने जानेवारी २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात सलामीला फलंदाजी पदार्पण केले, मात्र त्या तीन सामन्यांमध्ये त्याला काही चांगली कामगिरी करता आली नाही.

त्यानंतर रोहित आत-बाहेर होत राहिला. नंतर त्याला पुन्हा एकदा सलामीला येण्याची संधी मिळाली, ते वर्ष होते २०१३. त्यानंतर रोहितने सातत्याने चांगली कामगिरी करत आपले स्थान कायम ठेवले. (Rohit Sharma became the fastest player to complete 10,000 runs as an opener in ODIs, 3rd ODI between India and West Indies).

Comments are closed.