सुरक्षा रक्षकाने लहान मुलाला पकडले, रोहित शर्मा रागाने लाल झाला; हिटमॅनच्या व्हिडीओने सगळ्यांची


रोहित शर्मा शिवाजी पार्क व्हिडिओ: भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा मैदानात परतण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. येत्या 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया (India tour of Australia) दौऱ्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत तो तब्बल 7 महिन्यांनंतर टीम इंडियासाठी खेळताना दिसणार आहे. या मालिकेसाठी रोहित कसून सराव करत आहे. शुक्रवारी (10 ऑक्टोबर) सरावासाठी रोहित शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) गेला होता. सोशल मीडियावर त्याच्या या सराव सत्राचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये भारताचा हा माजी कर्णधार एका छोट्या चाहत्यासाठी सुरक्षा रक्षकावर भडकताना दिसतो.

सुरक्षा रक्षकाने लहान मुलाला पकडले, रोहित शर्मा रागाने लाल झाला… (Rohit Sharma Gets Furious On Security Guard)

व्हिडिओमध्ये दिसते की, एक छोटा मुलगा आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी दोऱ्या ओलांडून पुढे येतो. त्याच वेळी रोहित आपला किटबॅग आवरत असतो. सुरक्षा रक्षक त्या मुलाला पकडतो, आणि हे पाहताच रोहित रागाने जोरात ओरडतो. तो म्हणतो की, एएएएएए…!” त्याच्या शेजारी उभा असलेला व्यक्ती लगेच म्हणतो, “अरे हळू, हळू, हळू…”. मग तो छोटा फॅन रोहितकडे येतो, आणि “हिटमॅन” त्याच्याशी काहीतरी बोलतो.

‘हिटमॅन’ला पाहण्यासाठी शिवाजी पार्कवर तुफान गर्दी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेची तयारी करताना रोहित शानदार लयीत दिसला. नेट्सवर त्याने चांगले कव्हर ड्राइव्ह आणि दमदार स्वीप्स मारले, ज्यामुळे मैदान हिटमॅन, हिटमॅनच्या घोषणांनी दणाणून गेले. त्याच्या सरावादरम्यान भारताचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि मुंबईचा युवा खेळाडू अंगकृष रघुवंशी उपस्थित होते. रोहितची पत्नी ऋतिका सजदेह देखील जवळपास दोन तास सराव मैदानावर होती.

हे ही वाचा –

Yashasvi Jaiswal : नको तेच घडलं, जैस्वाल 175 धावांवर RUNOUT, यशस्वी शुभमनवर संतापला, बोल बोल बोलला, गिल पाहत बसला, VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.