रोहित शर्माची नवी इनिंग! टीव्हीवर दिसणार, मात्र क्रिकेटपासून दूर जाणार? BCCI चा नियम घ्या जाणून

क्रिकेटचे मैदान गाजवणारा हिटमॅन रोहित शर्मा आपली नवी इनिंग सुरू करण्यास पूर्णपणे सज्ज झाला आहे. भारताचा माजी कर्णधार आता ‘फॅमिलि फुल हाऊस’ या शोच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित करणार आहे. हा कार्यक्रम येत्या 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्याच्या या निर्णयामुळे त्याची क्रिकेट कारकिर्द धोक्यात येईल का, हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. चला, तर मग जाणून घेऊ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) नियम काय सांगतो ते.

रोहितने कसोटी आणि टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो भारतासाठी केवळ एकदिवसीय प्रकारचे सामने खेळतो. तसेच तो भारताच्या आगामी योजनांचा महत्त्वाचा भागही आहे. अशातच त्याने टीव्ही शोचे सूत्रसंचालन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटला धोका आहे का?

BCCI चा नियम काय सांगतो?
रोहितच्या टीव्हीवरील पदार्पणामुळे त्याच्या क्रिकेटमधील भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, मात्र एकाच वेळी टीव्हीमध्ये सूत्रसंचालन करणे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे सुरू ठेवणे यांच्यात कोणतीही अधिकृत स्वरूपाची अडचण असल्याचे समोर आलेले नाही.

तसेच बीसीसीआयने त्यांच्या नियमांमध्ये असे नमूद केलेले नाही की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेले क्रिकेटपटू टीव्ही शोचे सूत्रसंचालन करू शकत नाही. यामुळे रोहितच्या क्रिकेट कारकिर्दीला धोका नसल्याचे स्पष्ट होते.

रोहितचे पुढील लक्ष्य 2027 चा एकदिवसीय विश्वचषक
रोहितने जेव्हा लॉर्ड्सवर एकदिवसीय शतक झळकावले तेव्हा त्याने त्याच्या फॉर्मबद्दल टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले होते. तो या ऐतिहासिक मैदानावर एकदिवसीय शतक करणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला होता. त्याच्या या फॉर्ममुळे त्याचे पुढील ध्येय 2027 चा एकदिवसीय विश्वचषक असल्याचे ठळक होते. त्याचे संघातील स्थानही अधिक कायम झाले.

तसेच रोहित भारताच्या योजनांचा भाग असल्याचे बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले आहे. नुकतेच मुंबईमध्ये दोन्ही संघांच्या कर्णधार आणि प्रशिक्षकांसोबत एक बैठक पार पडली. (Rohit Sharma makes his TV debut—will he have to bid adieu to cricket now? What does the BCCI rule say?)

Comments are closed.