तुला वडापाव हवाय का?, मी घेऊन आलोय; भर सामन्यात प्रेक्षक ओरडला, रोहित शर्माची धमाकेदार रिअॅक्शन
मुंबई विरुद्ध सिक्कीम रोहित शर्मा वडा पाव व्हिडिओ : जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने खळबळ उडवून दिली. तब्बल सात वर्षांनंतर रोहित शर्माने या स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं. त्याच्या या खेळीने सामन्याचं चित्रच बदललं, मुंबईने हा सामना सहज जिंकला. दरम्यान, एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका चाहत्याने थेट रोहित शर्मालाच वडापावची ऑफर दिली, ज्यावर रोहित शर्मा पण थेट प्रतिक्रिया दिली.
तुला वडापाव हवाय का?, मी घेऊन आलोय; भर सामन्यात प्रेक्षक ओरडला अन्…
खरं तर, मुंबई विरुद्ध सिक्कीम सामन्यादरम्यान हा प्रसंग तेव्हा घडला, जेव्हा रोहित शर्मा बाउंड्री लाईनजवळ फिल्डिंग करत होता. काही चाहते त्याच्या मागून हसत-खेळत, “रोहित भाऊ, वडापाव खाणार का?” अशी हाक मारतात. यावर रोहितने अत्यंत मजेशीर अंदाजात हात वर करून, “नको रे बाबा” अशी प्रतिक्रिया दिली. रोहितच्या या क्षणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
जयपूरमधील विजय हाजरे ट्रॉफी सामन्यादरम्यान रोहित शर्माला वडापाव मागून लोक चिडवत आहेत. 😭 pic.twitter.com/8wXm9mDewT
— प्रामाणिक क्रिकेट प्रेमी (@Honest_Cric_fan) 24 डिसेंबर 2025
रोहित शर्माच्या ऐतिहासिक खेळी
जयपूरमध्ये झालेल्या या सामन्यात सिक्कीमने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 236 धावा केल्या. विकेटकीपर-फलंदाज आशीष थापाने 84 चेंडूमध्ये 79 धावांची झुंजार खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या मिळवून दिली. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईकडून मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने एकहाती सामना संपवला. रोहितने अवघ्या 94 चेंडूमध्ये नाबाद 155 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने 18 चौकार आणि 9 षटकार ठोकले. फक्त 62 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत रोहितने आपला क्लास पुन्हा एकदा सिद्ध केला. परिणामी, मुंबईने जवळपास 20 षटके शिल्लक असतानाच हा सामना 8 विकेट्सने जिंकला.
सात वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीत दणदणीत पुनरागमन
हा सामना रोहित शर्माचा तब्बल सात वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीतील पहिलाच सामना होता. 2008 साली या स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या रोहितने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतकही याच स्पर्धेत झळकावले होते. या खेळीसह रोहितने लिस्ट-ए क्रिकेटमधील आपले 37वे शतक पूर्ण केले आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली शानदार फॉर्म पुन्हा अधोरेखित केली.
विक्रमाशी बरोबरी, डेव्हिड वॉर्नरसोबत नाव
रोहितची ही खेळी आणखी एका खास कारणामुळे ऐतिहासिक ठरली. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 150 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या खेळीच्या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी केली. आता दोघांच्या नावावर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 150+ धावांच्या प्रत्येकी 9 खेळी नोंदल्या आहेत. रोहितचा याआधीचा 150+ स्कोअर 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 159 धावांचा होता. तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा अशी खेळी करत त्याने आपल्या फॉर्मवरचे सर्व प्रश्नचिन्ह दूर केले.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.