मुंबईचा राजा, रोहित शर्मा! वानखेडेवरील स्टँडला शरद पवार, हिटमॅन आणि अजित वाडेकर यांचे नाव

वानखेडे स्टेडियम समारंभ: वानखेडे स्टेडियममध्ये आज एक भव्य सोहळा पार पडला. टीम इंडियाचा हिटमॅन, मुंबईचा अभिमान रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नावाने स्टँडचं नामकरण करण्यात आले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच अशा मोठ्या सोहळ्यात सहभागी झाला. या खास कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा उपस्थिती होते. याचवेळी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर(Ajit Wadekar and) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाने देखील स्टँडचं नामकरण झाले. तसेच एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावाने एमसीए ऑफिस लाउंजचं उद्घाटन झाले.

रोहित शर्माच्या (Rohit Sharma Stand at Wankhede) अभूतपूर्व योगदानाची आणि क्रिकेटमधील त्यांच्या शानदार कारकिर्दीची दखल घेण्यासाठी एमसीएकडून हा सन्मान दिला जात आहे. वानखेडे स्टेडियम, जिथे रोहितने अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत, तिथे आता रोहित शर्मा स्टँड म्हणून ओळखले जाणारे स्टँड असेल. वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावावर स्टँड आहेत आणि रोहितचे नावही त्या यादीत जोडल्या गेले आहे.

वानखेडे स्टेडियमवरील पॅव्हेलियनच्या तिसऱ्या लेव्हलला रोहितचे नाव देण्यात येणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 2024चा टी-20 विश्वचषक आणि 2025 चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला आहे. जरी त्याने टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याचे यश कायमचे अमर राहील.

अधिक पाहा..

Comments are closed.