व्हिडिओ: आता सोडू नका, आपले हृदय अद्याप पूर्ण नाही …; रोहित-विरतला एकत्र पाहिल्यानंतर दिल्लीचे सर्व भावनिक आहेत.
रोहित शर्मा विराट कोहली इंड. वि. भारत आणि वेस्ट इंडिज (Ind vs WI) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने 2-0 अशा फरकारने मालिका जिंकली. आता टीम इंडिया आज सकाळी दिल्लीवरुन ऑस्ट्रेलियासाठी (India vs Australia) रवाना झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यासह इतर खेळाडू दिल्ली विमानतळावर पोहोचले. यावेळी मात्र सगळ्यांचं लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडे होतं. दरम्यान, रोहित शर्मा काल मुंबई विमातळावरुन दिल्लीसाठी रवाना झाला होता. तर कालच लंडनवरुन विराट कोहलीही दिल्लीत पोहोचला होता. दिल्लीत टीम इंडियाचे सर्व खेळाडू दाखल झाल्यानंतर सर्व ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले.
#वॉच | भारतीय क्रिकेट टीमचे सदस्य दिल्ली विमानतळावरून सुटतात.
१ October ऑक्टोबर, २०२25 रोजी सुरू झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत ऑस्ट्रेलियाला दौरा करणार आहे. pic.twitter.com/vw9m5obzlt
– वर्षे (@अनी) 15 ऑक्टोबर, 2025
विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळतात. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माकडून एकदिवसीय संघाचं कर्णधारपद देखील काढून घेण्यात आलं आहे. आता शुभमन गिल भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रथम तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल. पहिला एकदिवसीय सामना 19 ऑक्टोबर रोजी ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाईल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच अनेक दिवसांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला एकत्र पाहून सोशल मीडियावर चाहते भावूक झाले आहेत. अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं…अशा प्रकारच्या भावना नेटकरी व्यक्त करत आहेत. जवळपास 7 महिन्यांनंतर रोहित आणि विराट टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार आहे.
हिटमन आणि किंग भारतीय क्रिकेटमध्ये 7 महिन्यांनंतर परत आले आहेत … !!! 😍 [IANS] pic.twitter.com/atzaszerz4
– जॉन्स. (@Criccrazyjhons) 15 ऑक्टोबर, 2025
रोहित आणि विराट एकदिवसीय विश्वचषकात खेळतील का? (Rohit And Virat ODI World Cup 2025)
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शुभमन गिलला (Shubhman Gill) भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. आता, रोहित एकदिवसीय संघात सतत उपस्थित असूनही, शुभमन गिलकडे एकदिवसीय संघाचे नेतृत्वही सोपवण्यात आले आहे. त्यामुळे 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या सहभागाबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर, निवडकर्ता आणि माजी क्रिकेटपटू अजित आगरकर यांना 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या सहभागाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरात अजित आगरकर म्हणाले की, रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही सध्या यावर भाष्य करू इच्छित नाहीत.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs Aus ODI And T20 Schedule)
पहिला एकदिवसीय सामना: 19 ऑक्टोबर (ऑप्टस स्टेडियम)
दुसरा एकदिवसीय सामना: 23 ऑक्टोबर (अॅडलेड ओव्हल)
तिसरा एकदिवसीय सामना: 25 ऑक्टोबर (एससी ग्राउंड)
पहिला टी-20: 29 ऑक्टोबर (मनुका ओव्हल)
दुसरा टी-20: 31 ऑक्टोबर (एमसीजी)
तिसरा टी-20: 2 नोव्हेंबर (बेलेरिव्ह ओव्हल)
चौथा टी-20: 6 नोव्हेंबर (हेरिटेज बँक स्टेडियम)
पाचवा टी-20: 8 नोव्हेंबर (गब्बा स्टेडियम)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India ODI Squad vs Australia)
शुबमन गिल- कॅप्टन, श्रेयस अय्यर-कॅप्टन, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीष कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हरशीत राणा, मोहम्मद सिराज, अरशदीप सिंह, प्रसिध कृष्णा, ध्रुव ज्युरेल, यशसवी जयस्वाल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India T20 Squad vs Australia)
सूर्यकुमार यादव- कर्णधार, अभिषेक शर्मा, शुभमन गिल- उपकर्णधार, तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.