अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स, रोहिणी खडसे म्हणाल्या, खरात कांड खूप मोठा, थेट अटक
जळगाव : खरात कांड हा खुप मोठा आणि खोल विषय आहे, या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी समन्स न बजावता थेट अटक करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केली आहे. रोहिणी खडसे यांनी पोस्ट करत म्हटलं की, नाशिक खरात ‘कांड’मध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांना एसआयटीचे समन्स आले असल्याचे कळत आहे. खरात कांड हा खुप मोठा आणि खोल विषय आहे. एकाप्रकारे हे एक रॅकेटच आहे. या रॅकेट पर्दाफाश करण्यासाठी समन्स न बजावता थेट अटक कारवाई प्रशासनाने करायला हवी असं त्या म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या की, आरोपींना पुरावे नष्ट करण्याची कोणतीही संधी मिळू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी.
रोहिणी खडसे यांची सोशल मिडीया पोस्ट
नाशिक खरात ‘कांड’मध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांना एसआयटीचे समन्स आले असल्याचे कळत आहे. खरात कांड हा खुप मोठ आणि खोल विषय आहे. एकाप्रकारे हे एक रॅकेटच आहे. या रॅकेट पर्दाफाश करण्यासाठी समन्स न बजावता थेट अटक कारवाई प्रशासनाने करायला हवी. आरोपींना पुरावे नष्ट करण्याची कोणतीही संधी मिळू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. (Rohini Khadse)
नाशिक खरात ‘कांड’मध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांना एसआयटीचे समन्स आले असल्याचे कळत आहे.
खरात कांड हा खुप मोठा आणि खोल विषय आहे. एकाप्रकारे हे एक रॅकेटच आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी समन्स न बजावता थेट अटक कारवाई प्रशासनाने करायला हवी. आरोपींना पुरावे नष्ट… pic.twitter.com/JsHOIXnLfu
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) 29 मार्च 2026
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी होणार
अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) आता आपला मोर्चा खरातशी संबंधित संस्थांकडे वळवला आहे. खरातच्या ‘शिवनिका’ संस्थेचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आले असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनाही चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.शिवनिकासंस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एसआयटी सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती आहे, रूपाली चाकणकर यांची देखील एसआयटी कडून आता चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘शिवनिका’ संस्थेचे सर्व सदस्य चौकशीच्या फेऱ्यात
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातने स्थापन केलेल्या ‘शिवनिका’ संस्थेच्या माध्यमातून अनेक आर्थिक व्यवहार आणि कार्यक्रम पार पडले होते. या संस्थेवर विविध वेळी कार्यरत असलेल्या सर्व आजी-माजी सदस्यांची आता एसआयटीकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. या सदस्यांना लवकरच चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असून, संस्थेच्या निधीचा वापर आणि खरातला मिळालेले पाठबळ यावर पोलीस लक्ष केंद्रित करत आहेत.
‘शिवनिका’ (Shivanika) या संस्थेच्या विश्वस्त मंडळातील नावे
कॅप्टन अशोककुमार एकनाथ खरात
डॉ. जितेंद्र गणपतराव शेळके
सौ. कल्पना अशोककुमार खरात
ना. सौ. रूपाली निलेश चाकणकर
श्री. सुभाषराव केशवराव जमे
श्री. ललित प्रकाश गोफणे (सीए)
डॉ. नंदकिशोर तुकाराम काटोरे
आणखी वाचा
Comments are closed.