युद्धाचा रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका, ४ अब्ज डॉलरचे सोने विकल्यानंतर आता सरकार करणार हिऱ्यांचा लिलाव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

युक्रेनसोबतच्या प्रदीर्घ युद्धामुळे रशियाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या वाढत्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी रशियाने यापूर्वी तब्बल ४ अब्ज डॉलरचे सोने विकले होते आणि आता रशिया सरकारने आपल्या अधिकृत सरकारी तिजोरीतील हिऱ्यांचा लिलाव करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

रशियाच्या अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, येत्या ९ सप्टेंबर रोजी मॉस्कोमध्ये २.१६ ग्रॅम हिऱ्यांचा लिलाव केला जाणार आहे. सरकारच्या नियमानुसार हे हिरे केवळ रशियाचे नागरिकच खरेदी करू शकतील. या लिलावात सहभागी होण्यासाठी २५०० डॉलरची टोकन मनी (अनामत रक्कम) जमा करणे अनिवार्य असून यासाठी २० ऑगस्ट ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. लिलाव यशस्वी झाल्यानंतर एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या जातील, ज्यानुसार हिऱ्यांची मालकी दिली जाईल. विशेष म्हणजे, रशियामध्ये आतापर्यंत २.१६ ग्रॅमपेक्षा कमी वजनाचेच हिरे विकले जात होते. प्रथमच एवढ्या वजनाच्या हिऱ्यांचा लिलाव सरकारकडून केला जात आहे.

यापूर्वी रशियाने मोठ्या प्रमाणावर सोन्याची विक्री केली आहे. युक्रेनियन मीडिया युनायटेड न्यूज २४ च्या वृत्तानुसार, रशियाच्या अर्थ मंत्रालयाने गेल्या ६ महिन्यांत तब्बल ४४५ टन सोने विकले आहे. तसेच, मार्च २०२६ मध्ये ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेनेही दावा केला होता की, रशियाने एका वर्षात ४ अब्ज डॉलरचे सोने विकले आहे आणि रशियन सरकारने या माहितीचे अद्याप खंडन केलेले नाही.

Comments are closed.