नंदूरबारमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भाजप नेते विजय चौधरींविरोधात गुन्हा दाखल
नंदुरबार बातम्या : नंदूरबारमध्ये भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्याविरोधात माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या भावाने विनयभंग आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दप्रयोग झाल्याचा आरोप असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विजय चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
विजय चौधरी आणि संदीप चौधरी यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणी नंदूरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नों झाला आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह व अवमानकारक शब्दांचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या भावानेच भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याने नंदुरबारमधील भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. एबीपी माझा या क्लिपची पुष्टी आम्ही करत नाही.
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Comments are closed.