शेजारी राहणाऱ्या मुलासोबतच्या प्रेमसंबंधाला विरोध, रागाच्या भरात आईनेच संपवलं पोटच्या मुलीला

उल्हासनगर क्राईम न्यूज : उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. घरा शेजारी राहणाऱ्या मुलासोबत प्रेमसंबंधाच्या कारणावरून आईने आपल्या 19 वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक एकच्या पोलिसांनी आरोपी आई आशा गरड हिला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

उल्हासनगर -1 परिसरातील भैय्यासाहेब आंबेडकर नगर येथे राहणारी अमृता गरड हिच्या घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधाला आई आशा गरड यांचा विरोध होता. याच कारणावरुन काल रात्री आई आणि मुलीमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी घरात अमृताचे वडील आणि दोन भाऊ झोपलेले होते. वादानंतर अमृता घर सोडून जाण्याच्या तयारीत असताना, रागाच्या भरात आई आशा गरड हिने ओढणीच्या सहाय्याने मुलीचा गळा आवळून हत्या केली.

या घटनेत अमृताचा मृत्यू झाला आहे. घटना घडल्यानंतर अमृताच्या वडिलांनी स्वतः उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक 1 येथे जाऊन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. आरोपी आई आशा गरड हिला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक 1 चे अधिकारी करत आहेत.

Comments are closed.