पृथ्वी शॉवर पुन्हा अन्याय! डबल सेंच्युरी मारूनही दुर्लक्ष, ऋतुराजने केलं असं काही की सगळे थक्क
रुतुराज गायकवाड-पृथ्वी शॉ रणजी करंडक : रणजी ट्रॉफीत चंदीगडविरुद्ध (Maharashtra vs Chandigarh Ranji Trophy) तब्बल 222 धावांची खेळी करत पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला दबदबा सिद्ध केला आहे. मात्र, महाराष्ट्रासाठी डबल सेंचुरी झळकावूनही पृथ्वी शॉला जेवढा सन्मान मिळायला हवा होता, तो मिळाला नाही. त्यानंतर संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) जे पाऊल उचलले, त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
ऋतुराज गायकवाडने केलं असं काही की सगळे थक्क (Ruturaj Gaikwad shared his award with Prithvi Shaw)
महाराष्ट्रासाठी ऋतुराज गायकवाडनेही शानदार कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने 116 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात 36 धावांचे योगदान दिले. या दमदार खेळीमुळे महाराष्ट्राने विजय मिळवला. सामन्यानंतर गायकवाडला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला, पण त्याला वाटले की या पुरस्काराचा खरा हकदार तो नाही, तर पृथ्वी शॉ आहे. त्यामुळे त्याने पृथ्वीला बोलावले आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी त्याच्यासोबत शेअर केली. या कृत्यामुळे ऋतुराजचं सर्वत्र कौतुक होत आहे.
सामायिक गौरव, खरा आत्मा 🫡
शॉच्या सनसनाटी 222 धावांच्या खेळीमुळे महाराष्ट्राचा विजय निश्चित करणाऱ्या रुतुराज गायकवाडने आपला सामनावीराचा पुरस्कार पृथ्वी शॉसोबत शेअर केला.
एक हावभाव जो मोठ्या प्रमाणात बोलतो — टीमवर्क, आदर आणि परस्पर उत्कृष्टता.#mca… pic.twitter.com/yMWHsW7Miq— महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (@MahaCricket) 28 ऑक्टोबर 2025
डेब्यू सामन्यात झाला होता शून्यावर बाद
महाराष्ट्रासाठी पहिल्याच सामन्यात पृथ्वी शॉचा सुरुवात निराशाजनक झाली होती. तो आपल्या डेब्यू डावात शून्यावर बाद झाला होता. पण त्यानंतर त्याने जोरदार पुनरागमन केले. चंदीगडविरुद्ध पहिल्या डावात फक्त 8 धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने केवळ 156 चेंडूंमध्ये 222 धावांची वादळी खेळी साकारली. या खेळीत त्याने 29 चौकार आणि 5 षटकार लगावले. त्याच्या या आक्रमक फलंदाजीमुळेच महाराष्ट्राने चंदीगडवर 144 धावांनी विजय मिळवला.
आता नव्या सुरुवातीच्या तयारीत…
पृथ्वी शॉचा क्रिकेट प्रवास वादांपासून कधीच दूर राहिलेला नाही. त्याला बरीच टीका सहन करावी लागली आहे, विशेषतः त्याच्या फिटनेसबद्दल. शिवाय, मैदानाबाहेरील घटनांमुळे त्याची प्रतिमा डागाळली गेली आहे. अलिकडेच, शॉ क्रिकेटपटू मुशीर खानसोबत मैदानावर झालेल्या वादात अडकला होता. अलीकडेच क्रिकेटर मुशीर खानसोबत त्याचा मैदानावर वाद झाला होता. मात्र आता पृथ्वी शॉ नव्या जोमाने मैदानात उतरत आहे. वाद विसरून तो पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी झटतो आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.