सचिन अहिरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; आदित्य ठाकरेंचं 2029 वरळी विधानसभेतलं आव्हान वाढलं?

सचिन अहिर शिवसेना: विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी काल (30 जून) शिंदे शिवसेना प्रवेश केला. वरळी मतदारसंघात ताकद असलेल्या विधान परिषदेच्या आपल्या आमदाराने शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वरळीतील विधानसभा निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे यांच्या समोर आव्हान वाढलेलं पाहायला मिळतंय. वरळी विधानसभा मतदार संघात आदित्य ठाकरे यांचा विजय हा सहज व्हावा यासाठी 2019 मध्ये सचिन अहिर यांना शिवसेना पक्षात घेतलं. त्यासोबत सचिन अहिर यांना 2022 मध्ये विधान परिषद आमदारकी पक्षाने दिली. (Sachin Ahir Shivsena)

2019 आणि 2024 च्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांना सचिन अहिर यांचा सोबत राहण्याचा फायदा झाला. 2019 च्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघात जेव्हा विजयी झाले, तेव्हा त्यांचा विजय जवळपास 67, 427 झाला. मात्र 2022 ला शिवसेना पक्ष फुटल्यानंतर शिंदे शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात 2024 च्या निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेनेला वरळी विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवार मिळाला नसला तरी त्यांनी मिलिंद देवरा यांना आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उभ केलं. (Sachin Ahir Shivsena)

2024 विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त 8,801 मतांनी आदित्य ठाकरेंचा विजय- (Sachin Ahir Shivsena)

2024 विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त 8,801 मतांनी आदित्य ठाकरेंचा विजय झाल्याचा पाहायला मिळालं. विजयाचा मतांचा अंतर मोठ्या प्रमाणावर शिंदे शिवसेने कडून उमेदवार दिल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे आता स्थानिक आमदार आणि नेता म्हणून सचिन अहिर हे शिंदे शिवसेनेत गेल्यानंतर 2029 च्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र आहे. वरळी हा जरी ठाकरेंचे शिवसेनेचा बालेकिल्ला दिसत असला तरी सध्या पक्षात पडलेली फुट निघून गेलेले लोकप्रतिनिधी आणि त्यात सचिन अहिरांनी पक्षाला सोडून जाणं. या सगळ्यामुळे वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरेंसाठी 2029 च्या निवडणुकीचा विचार केला तर सध्या तरी आव्हानात्मक दिसतोय.

आदित्य ठाकरे काय म्हणाले? (Aditya Thackeray On Sachin Ahir)

सचिन अहिरांना आम्ही काय कमी केलं?, अहिरांच्या भावाला बीएमसी दिली, मुलीला प्रभाग समिती दिली, त्यांना बेस्टचं अध्यक्षपद दिलं. रोज भेटत होतो, आता काय अहिरांसारख्यांची रोज काय आरती करायची?, जवळचे आणि ज्यांना सगळं काही मिळतं तेच निघून जातात. कुणाच्या जाण्याने धक्का बसत नाही. वरळी, शिवडी हा आमचा बालेकिल्ला आहे.आमचं तिकडचं काम बोलेल. तुम्हाला अजून काय हवंय, आणखी काय ओरबाडाणार?, सगळ्या परिवाराला काही ना काही दिलंय, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. तसेच वरळीतून ते (सचिन अहिर) उमेदवार असतील तर काही फरक पडणार नाही, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं. सचिन अहिरांना हाच प्रश्न आहे की, जे सोडून गेले, जे मंदिरं लुटतायत त्यांच्यासोबत तुम्ही कसे जाऊ शकता? आम्हाला खोलवर अभ्यास केल्यावर हे लक्षात आलंय की, हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

कोण आहेत सचिन अहिर? (Who Is Sachin Ahir?)

  • सचिन अहिर ठाकरे गटाचे सध्याचे विधानपरिषदेचे आमदार
  • विधानसभा निवडणुकीत तीन वेळा,विधानपरिषदेवर एकदा विजयी
  • वरळीमधून 1999, 2004 ,2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी
  • 2009 ला गृहनिर्माण राज्यमंत्रिपदी
  • 26 जुलै 2019 ला राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल
  • 2020 मध्ये अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी
  • 2022 मध्ये विधानपरिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती
  • 30 जून 2026 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत
  • 30 जून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी भरला अर्ज

संबंधित बातमी:

Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: एकनाथ शिंदेंची एक ऑफर आणि ठाकरेंचा विश्वासू आमदार थेट शिंदे गटात; सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाची Inside Story

Comments are closed.