योगेश कदमांची शिफारस आली, पण सचिन घायवळचा शस्त्र परवाना पोलिसांनी ‘होल्ड’वर ठेवला


पुणे : गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ (सचिन घयवाल) प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप होत असताना शस्त्र परवानासंबंधी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या शिफारसीनंतरही निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्याचं समोर आलं.

सचिन घायवळ याने शस्त्र परवान्याचा अर्ज पुणे पोलिसांकडे दिला होता. मात्र पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या अर्जाची पडताळणी केली. त्यात सचिन घायवळची गुन्हेगारीची पार्श्वभूमी समोर आली. त्यामुळे त्यांनी हा अर्ज 20 जानेवारी 2025 रोजी नाकारण्यात आला.

योगेश कदम बातम्या: शस्त्र परवान्यासाठी गृहराज्यमंत्र्यांची शिफारस

पुणे पोलीस आयुक्तांनी परवाना नाकारल्यानंतर सचिन घायवळ हा शस्त्र परवान्यासाठी थेट गृहराज्यमंत्र्यांच्या दारी गेला. तिथून त्याने शस्त्र परवाना मिळवण्यासाठी शिफारस पत्र आणलं. ते शिफारसपत्र पुन्हा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे आलं. 26 जूनला तसा शासन आदेश आला. मात्र, अमितेश कुमार यांनी सचिन घायवळच्या शस्त्र परवान्याच्या अर्जाला होल्डवर ठेवलं. याचाच अर्थ सचिन घायवळला अजुनही पुणे पोलिसांकडून शस्र परवाना दिला गेला नाही.

गुंड निलेश घायवळ सध्या लंडनला फरार झाला असून त्याचा भाऊ सचिन घायवळही फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. सचिन घायवळच्या शोधात पुणे पोलीस असून घायवळ गँगबद्दल रोज काही ना काही खुलासा समोर येत आहे.

सचिन घयवाल: सचिन घायवळ फरार

पुण्यातील गुंड निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची घटना ताजी असतानाच त्याचा भाऊ सचिन घायवळचे कारनामेही चर्चेत आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सचिन घायवळचीही भावाप्रमाणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना गृहरात्र्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांना दिलेले आदेश वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

सचिन घायवळनं काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलिसांनी परवाना देण्यास नकार दिला. याच सचिन घायवळने पुढे शस्त्र परवान्यासाठी थेट गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे अर्ज केला. योगेश कदम यांनीही या अर्जानुसार सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्याचे आदेश दिलेत. मात्र, या आदेशानंतरही पुणे पोलिसांनी सचिन घायवळची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता शस्त्र परवाना देण्यास नकार दिला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.